
दैनिक चालु वार्ता उदगीर प्रतिनिधी -अविनाश देवकते
लातूर (उदगीर) : उदगीर-जळकोट विधानसभा मतदारसंघात सध्या चर्चेचा विषय ठरलेलं नाव म्हणजे स्वप्निल जाधव. शांत, संयमी आणि प्रेमळ स्वभावाच्या या युवकाने अपक्ष उमेदवारी जाहीर करून मागील निवडणुकीत सर्वांना चकित केलं होतं. सत्ताधाऱ्यांना आणि प्रस्थापितांना आव्हान देणारा हा तरुण, एक नवा आशेचा किरण ठरतोय.
या युवकाच्या कार्यपद्धतीवर आणि जनसंपर्कावर वरिष्ठ पत्रकार नितीन एकुरकेर यांनी अतिशय अभ्यासपूर्ण दृष्टीकोनातून प्रकाश टाकला आहे. त्यांनी लिहिलेल्या विशेष लेखामधून स्वप्निल जाधव यांचा संघर्ष, सामाजिक भान आणि नेतृत्वगुण अधिक प्रभावीपणे समोर आले आहेत.
स्वप्निल जाधव यांनी शेतकरी, कामगार, व्यापारी, आणि युवकांमध्ये आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. कोणतीही राजकीय पदं किंवा सत्ताधारी गटांची साथ नसताना, त्यांनी ज्या आत्मविश्वासाने निवडणूक लढवली, तो त्यांच्या धाडसी वृत्तीचा उत्तम नमुना आहे.
उद्योगातून यशस्वी झाल्यावर त्यांनी मिळालेला पैसा आणि संसाधनं समाजहितासाठी वापरण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त उदगीर आणि जळकोट परिसरात मोठ्या प्रमाणावर बॅनर, शुभेच्छा संदेश आणि कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. यामध्ये तरुणांपासून ते ज्येष्ठांपर्यंत अनेकजण सहभागी झाले.
स्वप्निल जाधव यांचा हा प्रवास सामान्यांमधून असामान्यतेकडे जाणारा आहे. त्यांच्या नेतृत्वगुणांमुळे उदगीर-जळकोट मतदारसंघात एका नव्या राजकीय युगाची चाहूल लागते आहे.