
दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी : अनिल पाटणकर
पुणे : सध्या सर्वत्र शाळांचा उन्हाळी सुट्ट्यांचा काळ चालू असून या काळात मुलांनी नेहमीपेक्षा काहीतरी वेगळ करावे, स्वतःच्या सुप्त कलागुणांना वाव देवून छान व्यक्तिमत्व घडवावे या हेतूने अरण्येश्वर येथील एकता मित्र मंडळ (ट्रस्ट), वंचित विकास यांच्या माध्यमातून आणि टॅप टू स्माईल या संस्थेच्या सहकार्याने रविवारी (दि.०४) ‘अभिरुची समर कॅम्प’ आयोजित करण्यात आला.
या समर कॅम्प मध्ये मुलांनी झुम्बा डान्स केला, गाणी गायली, विविध खेळ खेळले, आलेल्या ताईंनी मुलांना पपेटच्या साह्याने छान गोष्टी सांगितल्या. दादा आणि ताईंसोबत सर्व सहभागी मुलांनी धम्माल..मस्ती… गाणी… गोष्टी.. फन गेम… ब्रेन गेम… चर्चा..संवाद.. खेळ…आणि बरंच काही… आनंदाच्या वातावरणात अनुभवत आनंद द्विगुणित केली व मुलांना खमंग ढोकळा व आमरस देण्यात आला. यावेळी मागील ८ महिने वंचित विकास तर्फे मुलांसाठी घेण्यात आलेल्या संगीत वर्गात शिकलेल्या देश भक्तीपर गीतांचे सादरीकरण मुलांनी करण्यात आले. सेवा निवृत्त मुख्याध्यापक पुणे महानगरपालिका, शिक्षण मंडळ, पुणे मनपाचे शिवाजी जाधव सर यांच्या शुभहस्ते मुलांना बक्षीस वितरण करण्यात आले.
या समर कॅम्पसाठी महत्वाचे सहकार्य लाभलेल्या टॅप टू स्माईलचे सर्व स्वयंसेवक हे मोठ्या आय.टी कंपन्यांमध्ये कार्यरत आहेत. काही शिक्षक, डॉक्टर, इंजिनियर,बिझनेस करणारे आहेत. आपली सामाजिक बांधिलकी जपत वेळात वेळ काढून हे सर्व अशा उपक्रमात सहभागी होत असतात. त्यांनाही मुलांसोबत वेळ घालवायला खूपच आवडत. टॅप टू स्माईलचे श्रुतिका भट्टड, उत्कर्षा गदादे व गार्गी पेठे यांनी समर कॅम्पसाठी पुढाकार घेतला. यावेळी मुलांचे मनोबल वाढविण्यासाठी पालकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकता मित्र मंडळाचे अध्यक्ष सुधीर ढमाले, कार्याध्यक्ष योगेश मांढरे, वंचित विकासच्या तेजस्विनी थिटे व टॅप टू स्माईलचे अभिमन्यू उपाध्याय यांनी समर कॅम्पचे नियोजन केले.