
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- स्वरूप गिरमकर
( पुणे ) वाघोली : शहरातील येरवडा परिसरातील जुना तरकेश्वर पुल (येरवडा पूल) अचानक खचल्याने वाहतुकीला मोठा फटका बसला आहे. पुलाच्या मध्यभागी मोठा खड्डा पडल्याने हा पूल तातडीने वाहतुकीस बंद करण्यात आला आहे.त्यामुळे येरवडा मार्गे जाणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, वाहनचालक आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
यामुळे पुणे स्टेशन, स्वारगेट किंवा शहराच्या इतर भागांकडे जाणाऱ्या नागरिकांनी येरवडा मार्ग टाळावा, असे प्रशासनाने आवाहन केले आहे.
पर्यायी मार्ग पुढीलप्रमाणे आहेत:
विमानतळ रस्ता (५०९) मार्गे कल्याणी नगर – कोरेगाव पार्क – पुढे इच्छित स्थळी
विश्रांतवाडी – डेक्कन कॉलेज – संगमवाडी मार्गे पुढे प्रवास
वाहतूक पोलीस आणि प्रशासनाने घटनास्थळी तातडीने बंदोबस्त वाढवून वाहतूक नियमन सुरु केले आहे. पर्यायी मार्गांचा वापर करून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.