
राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे निर्देश देण्यात आले आहेत.
राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पिके, घरे आणि पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे. वादळ आणि जोरदार वाऱ्यांसह झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिवांनी माहिती दिली की, ‘सचेत’ प्रणालीच्या माध्यमातून आतापर्यंत १९ कोटींहून अधिक नागरिकांना अलर्ट संदेश पाठवले आहेत. मदतकार्य सुलभ करण्यासाठी आधुनिक संप्रेषण प्रणालीचा वापर करण्यात आला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या निर्देशांमध्ये नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी आणि बाधितांना मदत देण्यासाठी त्वरित कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच नुकसानीचे सखोल सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. दरम्यान, राज्यात पावसाचा जोर कायम असून अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान, समोर आलेल्या माहितीनुसार राज्यात 41 हजार हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे. यात पालेभाजी, भात, बटाटे, लिंबू, मका, भुईमूग, कांदा, भाजीपाला, भात, मूग, टोमॅटो, कांदा-बटाटा, लिंबू, पपई, केळी या पिकांचा समावेश आहे. तसेच अनेक मुसळधार पावसामुळे अनेक घरात पाणी शिरले आहेत. तसेच अनेक घरांच्या भिंती पडल्या आहेत.