
पत्रकार परिषद गुंडाळावी लागली !
राज्याचे मत्स्य आणि बंदरे मंत्री नितेश राणे हे नेहमी हिंदू समाजासाठी आक्रमक भूमिका घेताना दिसतात. त्यामुळे त्यांच्या विधानामुळे अनेकदा वाद निर्माण झाला आहे. नितेश राणे हे पुन्हा एकदा या आठवड्याच्या शेवटी येऊ घातलेल्या बकरी ईदच्या निमित्ताने केलेल्यामुळे वादग्रस्त विधानामुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे.
जे आमच्या सणांच्या वेळी आम्हाला फुकटात सल्ले देतात, ते बकरी ईदच्या वेळी पर्यावरणपूरक बकरी ईद साजरी करा, असे का सांगत नाहीत? व्हर्च्युअली बकरा कापा, असं का सांगितलं जात नाही? असे नितेश राणे म्हणाले होते. त्यांच्या वक्तव्यासंदर्भात आज (3 जून) भाजपाचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना प्रश्न विचारण्यात आला. मात्र त्यांनी नंतर उत्तर देतो सांगून पत्रकार परिषद गुंडाळण्याचा प्रयत्न केला
संघटन पर्वाचा आढावा घेण्यासाठी आज प्रदेश भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण नागपूरला आले होते. यावेळी त्यांनी संपूर्ण कार्यक्रमाची माहिती पत्रदारांना दिली. त्यानंतर त्यानंतर नितेश राणेंच्या बकरी ईदबाबतच्या वक्तव्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर रवींद्र चव्हाण म्हणाले की, नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्याचे भाजपा समर्थन करत नाही. कारण आम्ही सर्वच धर्माचे सणवार त्यांच्या रितिरिवाजानुसार साजरे करण्यासाठी आग्रही असतो. सर्व जाती, धर्मात तेढ निर्माण होऊ नये, त्यांच्या सामाजिक परंपरा जपल्या जाव्या हीच भाजपाची भूमिका आहे. सध्या मी पक्षातील पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा घेण्यासाठी आलो आहे. त्यामुळे जेव्हा कधी पत्रकार परिषद घेईल, त्यावेळी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देतो, असे सांगून रवींद्र चव्हाण पत्रकार परिषद गुंडाळली.
नितेश राणे म्हणाले होते की, जेव्हा आमचे हिंदूंचे सण असतात, तेव्हा आम्हाला अनेक सल्ले दिले मिळतात. कोरडी होळी खेला, पर्यावरण पूरक होळी खेळा. दिवाळी येते तेव्हा आम्हाला सांगितले जाते की, फटाके फोडू नका. यामुळे पर्यावरणाचे नुकसान होते. आता तेच लोक, जे आम्हाला फुकटात सल्ले देतात, ते बकरी ईदच्या वेळी पर्यावरणपूरक बकरी ईद साजरी करा, असे का सांगत नाहीत? व्हर्च्युअली बकरा कापा, असं का सांगितलं जात नाही? बकरी ईदला हजारो बकरे कापले जातात, तर यावेळी आम्ही पर्यावरणपूरक ईद साजरी करू असा विचार मुसलमान समाज का करत नाही? हिंदूंना सल्ला देणारे पर्यावरण प्रेमी, प्राणी प्रेमी आता कुठे गेले? बकरा कापण्यासाठी परवानगी दिली जातेच कशी? जे नियम हिंदू पाळतात ते मुसलमान समाज का पाळत नाही? असे प्रश्न नितेश राणे यांनी उपस्थित केले होते