दैनिक चालु वार्ता उस्माननगर ( प्रतिनिधी )-लक्ष्मण कांबळे
नांदेड / उस्माननगर :- डाॅ.बाबासाहेब आंबेडकरी चळवळीतील योगदानाबद्दल कलंबर बुद्रुक ता.लोहा येथील सामाजिक कार्यकर्ते व आंबेडकर यौद्धा ,सामाजिक कार्याची जान असनारे व प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे खंदेसमर्थक डी.के.कांबळे कलंबरकर यांना समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल लोकनेते तथा कंधार लोहा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.
अण्णा भाऊ साठे पीपल्स फोर्सचे संस्थापक अध्यक्ष बापुराव वाघमारे व त्यांच्या टिमने
दि.२६ जून रोजी रूबी हाॅटेल ,नवीन नांदेड ,सिडको येथे २०२५ चा दिला जानारा छत्रपती राजश्री शाहूमहराज समाज भूषण पुरस्कार शाहूमहराज यांच्या जयंतीचे औचित्य साधुन समाजातील आंबेडकर यौध्दाचा छत्रपती शाहू महाराज समाजभूषण पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मराठवाड्यातील अनेक यौध्दाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते.यामध्ये कलंबर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर चळवळीतील धाडसी युवा सामाजिक कार्यकर्ते व सर्व सामान्य नागरिकांची जान ओळखणारे डी.के.कांबळे कलंबरकर यांचा संस्थेचे अध्यक्ष बा.रा.वाघमारे यांच्या हस्ते व दलित पॅथंर नेते रमेश खंडागळे यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत कांबळे यांचा समाजभूषण पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल लोकनेते तथा लोहा-कंधार विधानसभेचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी डी.के.कांबळे यांचा शाल ,पुष्पहार अर्पण करून यथोचित सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी शंकर पाटील घोरबांड व अनेक चिखलीकर समर्थक उपस्थित होते व अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
