
दैनिक चालु वार्ता उपसंपादक – वर्धा -अवधूत शेंद्रे
—————————————-
वर्धा – आष्टी :- तालुक्यातील खडकी गावातील विकासाभिमुख कामात प्रचंड लयलूट सुरु असून कामात हयगय आणि अनियमितता आणणाऱ्या सोनू उर्फ प्रतीक माणिकपुरे या कंत्राटदारापासून पासून खडकी गाव वाचवा अशा आशयाचे निवेदन आष्टी तहसीलदार डॉ.हंसा मोहने यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे पुढे निवेदनात असे म्हटले आहे की, खडकी गाव तीर्थक्षेत्र क वर्ग मध्ये समाविष्ट असून येथे विकासकामे सुरु आहेत मात्र संबंधित कंत्राटदार कडून रोड,नाली आणि सभागृहाचे बांधकाम झाले त्यात प्रचंड प्रमाणात संबंधित प्रशासनाला हाताशी धरून हयगय करून अनियमितता केली आहे त्यामुळे अल्पावधीतच जागोजागी नालीवरील रपटे तुटलेले आहे यात दोषी असणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात यावी यासह विविध समस्येचे निवेदन दिले आहे यात नवीन पाणीपुरवठा कार्यान्वित करून स्वतंत्र पाणीपुरवठा योजना सुरु करावी, गावातून जाणारा नाला याची साफसफाई करणे सदर नाल्या भोवताल झाडेझुडपे झाल्यामुळे नागरिकांना जीवघेणा धोका निर्माण होऊ शकतो, सदर साजा वरील तलाठ्यांला मुख्यालयी हजर राहण्याचे अनिवार्य करावे बौद्ध विहार समोरील झालेले अतिक्रमण हटवून त्या जागी सौंदर्यीकरण करण्यात यावे किन्हाळा व शिरसोली येथे पोलीस पॉईंट देण्यात यावा महिला बचत गट भवन बांधण्यात यावे आणि ग्रामपंचायत कार्यालयास कायमस्वरूपी ग्रामसेवक देण्यात यावा अशा मागण्या केलेल्या आहेत सदर मागण्या मान्य न झाल्यास येत्या पंधरा दिवसात उपोषण करण्याचा इशारा दिलेल्या निवेदनातून केला आहे यावेळी सीमा नागपुरे यांच्या नेतृत्वात कांचन नागपुरे, निलिमा ठाकरे,सुनीता कडू, मोहिनी नागपुरे, वर्षा सोलव, ज्योती द्रव्यकार, शीतल ठाकरे, राणी उदापूर,शोभा नागपूरे, ललिता नागपुरे उपस्थिती होती
सदर बांधकामाचा कंत्राट दीपक चरडे आणि सोनू माणिकपुरे यांनी केला असून सध्या शंभुशेष बाबा मंदिर रोडवर मुरूमवर टाकणे सुरु आहे, नाला उपसने बाबत ठराव पत्र पाठवले आहे सदर गाव समस्यासाठी आमचा योग्य पाठपुरावा सुरु आहे
नरेंद्र गुळघाने
ग्रामसेवक खडकी
खा. काळे यांची विकास कामे घेणारे बहुतांश कंत्राटदार अविश्वासू आणि पैसे बुडवणारे आहेत त्यामुळे खा.काळे यांची प्रतिमा मलिन करण्यात यांचा सिंहाचा वाटा आहे आणि यात साहूर परिसरातील कंत्राटदाराचा समावेश मोठा आहे
एक अनामिक
वरील कंत्राटदार संदर्भात प्रतिक्रियेसाठी तारासावंगा येथील देवकाई कन्स्ट्रक्शनचे आशिष कडू आणि आरोपग्रस्त कंत्राटदार सोनू माणिकपुरे यांना काही दिवसापासून सतत दररोज फोन केला असता प्रतिसाद मिळत नाही आहे त्यामुळे त्यांची बाजू मांडता येत नाही
प्रस्तुत प्रतिनिधी