
दैनिक चालु वार्ता उदगीर प्रतिनिधी-अविनाश देवकते
लातूर (उदगीर) : उदगीर विधानसभा मतदारसंघाचे माजी मंत्री आणि लोकप्रिय आमदार संजय बनसोडे यांना वाढदिवसानिमित्त राज्यातील विविध राजकीय पक्षांतील दिग्गज नेत्यांनी शुभेच्छा देत त्यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले आहे. विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडून आलेल्या शुभेच्छांनी जिल्हा राजकारणात चांगलीच चर्चा रंगली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या शुभेच्छा देताना म्हटले की,
“संजय बनसोडे हे एक विकासाभिमुख, कार्यक्षम आणि जनतेच्या हितासाठी झटणारे लोकप्रतिनिधी आहेत. रस्ते, शिक्षण, पाणीपुरवठा, आरोग्य व शेतकरी कल्याण क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली असून, अशा नेतृत्वाला माझा नेहमीच पाठिंबा राहील. त्यांचे कार्य केवळ राजकारणापुरते मर्यादित नसून, जनसेवेचा निस्वार्थ संघर्ष आहे.”
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनीदेखील संजय बनसोडे यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले,
“बनसोडे यांनी मंत्रीपदाच्या कार्यकाळात उदगीर-जळकोट मतदारसंघात चौफेर विकास केला. शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.”
याच कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अनेक ज्येष्ठ नेते व मंत्र्यांनी देखील आमदार संजय बनसोडे यांना शुभेच्छा देत त्यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले.
ज्येष्ठ नेते नवाब मलिक, माजी मंत्री आमदार दिलीप वळसे पाटील, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, क्रीडा मंत्री दत्तामामा भरणे आणि माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे या सर्व मान्यवरांनी संजय बनसोडे यांच्या कार्याचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या शुभेच्छा व पाठिंब्यामुळे आ. संजय बनसोडे यांच्या नेतृत्वावरचा जनतेचा विश्वास अधिक दृढ झाला असून, मतदारसंघात विकासाला नवे बळ मिळेल, अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे.