
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- स्वरूप गिरमकर
( पुणे ) वाघोली : दिनांक 03/07/2025 रोजी फिर्यादी श्री. ज्ञानोबा माधव जाधव, वय 19 वर्षे, रा. उबाळे नगर, वाघोली, पुणे व त्यांचा मित्र आकाश बनसोडे यांना मारहाण करून जिवे ठार मारण्याचा उद्देशाने धारदार शस्त्राने डोक्यात अनेक गंभीर वार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींविरोधात वाघोली पोलीस स्टेशन येथे गु .र.नं. 312/2025, भारतीय न्याय संहिता कलम 109, 351(2), 352, 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्याचा गुन्हे शाखा युनिट 6 कडुन समांतर तपास सुरू असताना यातील पाहीजे आरोपी हे शिरूर, पुणे येथे असले बाबत माहिती प्राप्त झाल्याने आरोपींचा शोध घेणे कामी मा. वरीष्ठांचे आदेशाने गुन्हे शाखा युनिट 6 कडील गिरीष नाणेकर व ऋषीकेश ताकवणे असे रवाना झाले होते. नमूद आरोपींचा शिरूर परिसरात वाघोली. पो. स्टे. येथील 2 अंमलदार यांचे सह शोध घेतला असता शिरूर बायपास, पुणे येथून आरोपी नामे 1) अनिकेत दिपक वानखेडे, वय 18 वर्षे, रा. आपले घर, लेन नं. 03, खराडी, पुणे 2) प्रवीण गोविंद माने, वय 18 वर्षे, रा. आपले घर, लेन नं. 03, खराडी, पुणे 3) विधी संघर्षित बालक, वय 17 वर्षे, 8 महिने रा. आपले घर, लेन नं. 03, खराडी, पुणे यांना ताब्यात घेण्यात आले आहे. नमूद आरोपीतांची वैदयकीय तपासणी करून पुढील कारवाई कामी वाघोली पो. स्टे. यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी मा. पंकज देशमुख अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे), मा. निखिल पिंगळे पोलीस उपआयुक्त गुन्हे, मा. श्री राजेंद्र मुळीक सहा.पोलीस आयुक्त सो गुन्हे-2 या वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक वाहीद पठाण, गिरीष नाणेकर, ऋषीकेश ताकवणे, प्रतिक्षा पानसरे, कीर्ती मांदळे यांचे पथकाने केलेली आहे.