
दैनिक चालु वार्ता कोल्हापूर प्रतिनीधी -पंडित चौगुले
कोल्हापूर दि. 5 लोक जनशक्ती पार्टी कोल्हापूर शाखा यांचे मार्फत कोल्हापूर जिल्हा कार्यालय येथे जयंती साजरी करण्यात आली.
कोल्हापूर जिल्हाध्यक्ष माननीय श्री बाळासाहेब भोसले यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केले व केंद्रीय मंत्री असताना जी कामे केली त्यांचा उजाळा देऊन त्यांनी केलेल्या कार्याचा आदर्श ठेवून त्याप्रमाणे पुढील वाटचाल लोक जनशक्ती पार्टीचे लोक व कार्यकर्ते करणार अशी ग्वाही दिली.
यावेळी कार्यक्रमास प्रशांत अवघडे, सतीश रास्ते, तकदीर कांबळे, हरी कांबळे,तुकाराम कांबळे,अनिल कुरणे सुभाष कांबळे,शंकर पाटील, शिवाजी कांबळे,प्रशांत आवळे,गौतम खांडेकर, पुंडलिक कांबळे, आधी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.