
संजय राऊतांची जहरी टीका !
भाजप खासदार शशिकांत दुबे यांनी मराठीविरोधी विधाने केल्याने मोठा वांदग निर्माण झाला आहे. दुबेंनी महाराष्ट्र राज्याविषयी अत्यंत हीन दर्जाचे विधान केले आहे. त्यांनी केलेल्या विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.
त्यांच्या विधानाचा महाराष्ट्रात निषेध नोंदविण्यात येत आहे. तसेच दुबे यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्यावरून टीका केली होती. त्यांच्या या टीकेला उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी हल्लाबोल केला आहे.
दुबेला सांगावे महाराष्ट्राच्या नादाला लागू नको. मग पटकून काय हे आम्हाला दाखवावं लागेल, असा थेट इशारा राऊतांनी दिला आहे. दुबे हा उद्योगपतींचा दलाल आहे. त्याला असे वाटते की, मुंबईतील त्याची दलाली कमी होईल, दुबे हा मुंबईच्या दलालीवर जगतो, अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी निशिकांत दुबेंवर केली आहे.
भारतीय जनता पक्षाच्या एकाही मंत्र्याने तरी दुबेचा निषेध केला का, असा प्रश्नही राऊतांनी केला आहे. यावेळी बोलताना संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टीकेची तोफ डागली. या राज्याला इतका नेभळट मुख्यमंत्री मिळाला आहे आणि सांगतोय मी मराठी आहे. तो डेप्युटी सीएम अर्धा दाढी वाला, त्याला शिवसेनेचे नाव घ्यायला लाज वाटली पाहिजे, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे.
नेमकं काय म्हणाले संजय राऊत?
मला देवेंद्र फडणवीस यांची कीव येते. त्यांनी यापुढे मराठी भाषेत कधीच संवाद साधू नये. तो जर खरंच मर्द मराठी असेल ना तर या दुबेचा बंदोबस्त करेल. या राज्याला इतका नेभळट मुख्यमंत्री मिळाला आहे आणि सांगतोय मी मराठी आहे. तो डेप्युटी सीएम अर्धा दाढी वाला त्याला शिवसेनेचे नाव घ्यायला लाज वाटली पाहिजे. हीच अर्धी दाढी कापून जनता तुम्हाला अर्ध्या दाढीसह महाराष्ट्रात फिरवेल, इतकी जनता चिडलेली आहे. या राज्याचे मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ तोंडात बोळा घालून बसले आहेत.
दुबेंवर प्रहार
म्हणे मराठी माणसाला पटकून पटकून मारू. हे उद्योगपतींची दलाली करून कमिशनखोरी करण्या इतका सोपं आहे का मिस्टर दुबे? हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. फेक डिग्री घेऊन हा माणूस संसदेत बसलेला आहे आणि तुम्ही महाराष्ट्राला धडे देत आहात.