दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी-एकनाथ गाडीवान.
देगलूर. तालुक्यातील मौ. देवापूर येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘मोहरम’ हा सण उत्साहात साजरा करण्यात आला. मोहरम या सणाचे एक विशेष खास म्हणजे हा महिना एकोपा आणि सहानुभूती व तसेच हिंदू- मुस्लिम धर्मात एकात्मता दर्शविते. मोहरम या महिन्यात सर्व मुस्लिम बांधवांनी उपवास करतात प्रार्थना करतात आणि गरजू लोकांना अन्नदान करतात. हे या सणाचे खास वैशिष्ट्ये आहे. देवापूर येथे सर्व हिंदू -मुस्लिम एकत्र येऊन गावातील नागरिकांनी उत्साहाने मोहरमात सहभागी होऊन विविध कलाविष्कार नृत्य,गाणे, शायरी, नाटके,असे अनेक मनोरंजनाचे कार्यक्रम सर्व नागरिकांनी एकत्र येऊन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. सर्व देवापूर गावातील ज्येष्ठ नागरिक,पदाधिकारी, महिला मंडळ, विद्यार्थी मित्र आदी मान्यवर उपस्थित राहून कार्यक्रम पार पाडले.
