दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- स्वरूप गिरमकर
( पुणे ) वाघोली : शिरूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गावांमध्ये वाढलेल्या चोरीच्या घटनांवर प्रतिबंध घालण्यासाठी प्रभावी पावले उचलण्यात येत आहे. गावाच्या प्रवेशद्वार, मुख्य रस्ते, शाळा, बाजारपेठा आणि संवेदनशील भागांत सीसीटिव्ही बसवून त्याद्वारे नियंत्रण ठेवावे.सुरक्षा दल व यंत्रणांना बळकटी द्यावी, असा बैठकीत निर्णय घेण्यात आला.
शिरूर तहसील कार्यालयात आयोजित बैठकीत पोलीस प्रशासन व ग्रामस्थ यांचा संयुक्त सहभाग हाच सुरक्षित गावांचे मूळ सूत्र असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीत शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी ग्रामपंचायत पदाधिकारी, पोलीस पाटील, ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.
*बैठकीत खालील प्रमाणे प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या.*
1. प्रत्येक गावामध्ये ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यात यावी.सदर यंत्रणेचे कार्य व त्यामधून चोरींच्या घटनांना कसा आळा बसतो. याबाबत मार्गदर्शन करून सदर यंत्रणा गाव पातळीवर पोलीस पाटील सरपंच व ग्रामस्थ यांनी समन्वयाने चालू करून घ्यावी.
– 2.प्रत्येक गावामध्ये ग्राम सुरक्षा दल असून ते ग्राम सुरक्षा दल ऍक्टिव्ह करून रोज रात्री गावामध्ये टप्प्याटप्प्याने रात्रग्रस्त करतील.जेणेकरून चोरीच्या घटना होणार नाही.
– 3.गावाच्या मुख्य रस्ते, प्रवेशद्वारे, बाजारपेठा, शाळा व संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्या बाबत ग्राम स्तरावर उपाययोजना करण्यात याव्या.
– 4.गावामध्ये वाढत चाललेल्या चोरीच्या घटनांच्या अनुषंगाने, ग्राम सुरक्षा दल व ग्रामसुरक्षा यंत्रणेला अधिक सक्षम करणे, तसेच गावांमध्ये सीसीटीव्ही बसविणेबाबत योग्य नियोजन व अंमलबजावणी करणे.
