दैनिक चालू वार्ता -शिरूर प्रतिनिधी -इंद्रभान ओव्हाळ
शिरूर (पुणे).
अमोल भाऊसाहेब झेंडे यांची पोलीस अधीक्षक, पुणे महानगर विकास प्राधिकरण (SP PMRDA, Pune) या महत्त्वाच्या पदावर नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे पोलिस खात्यात तसेच पुणे जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण आहे.
अमोल झेंडे हे आपल्या प्रामाणिक कार्यशैलीसाठी आणि कर्तव्यनिष्ठेबद्दल ओळखले जातात. त्यांनी याआधीही विविध पदांवर कार्यरत असताना उत्कृष्ट प्रशासनिक कौशल्य दाखवले आहे. PMRDA सारख्या वेगाने वाढणाऱ्या शहरी विकास प्राधिकरणात त्यांची नियुक्ती झाल्याने कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने ही एक महत्त्वपूर्ण पावले ठरणार आहे.
या नियुक्तीनंतर विविध सामाजिक संस्था, सहकारी अधिकारी, आणि नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अनेक ठिकाणी पोस्टर, फलक आणि सामाजिक माध्यमांद्वारे त्यांचे स्वागत व सन्मान केला जात आहे.
PMRDA अंतर्गत येणाऱ्या परिसरात कायद्याची अंमलबजावणी, गुन्हेगारीवर नियंत्रण आणि नागरी सुरक्षेसाठी त्यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.
