
दैनिक चालु वार्ता ठाणे-प्रतिनिधी-नागेश पवार
————-
दिवा – दिवा शहरातील फेरीवाल्यांसंदर्भात भाजप दिवा मंडळातर्फे मोर्चा खोलण्यात आला असून दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त शिवप्रसाद नागरगोजे यांची भेट घेऊन दिवा शहरातील स्टेशनं परिसर, मुंब्रादेवी कॉलनी रोड आणि दिवा आगासन रोड वरील पदपथ व रस्त्यांवरील अतिक्रमण मुक्त करण्या संदर्भात चर्चा तसेच तसेच शहर अतिक्रण मुक्त करण्यासाठी निवेदनही देण्यात आले.
दिवा स्टेशनं परिसरातील रस्ते व पद पाथांवरील अतिक्रण धारकांमध्ये व सर्वसामान्य नागरिकांमध्ये होणारे रोजचे वाद विवाद अनेकदा विकोपाला जात असल्याने, सततच्या या नागरि समस्यांबाबत संबंधित विभागाने गंभीरतेने दखल घेण्याची विनंती यावेळी करण्यात आली.
१० जुलै पर्यंत वर्दळ असलेल्या रस्ते पदपथांवरील अतिक्रमणांवर कारवाईचा ओघ वाढवावा अन्यथा ११ जुलै रोजी भाजपा दिवा मंडळा तर्फे रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल असे सहाय्यक आयुक्त नागरगोजे यांना यावेळी ठणकावून सांगण्यात आले असल्याचे भाजपा दिवा मंडळ अध्यक्ष सचिन भोईर यांनी सांगितले.
यावेळी मंडळ अध्यक्ष सचिन भोईर यांच्या समवेत माजी नगरसेवक अशोक पाटील, विजय भोईर, विनोद भगत, रोशन भगत, मधुकर पाटील, समीर चव्हाण, जयदीप भोईर ई. पदाधीकारी कार्यकर्ते उपस्थित होते.