
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी पुणे शहर -ॲड गुणाजी मोरे
____________
पुणे:कै. पतासीबाई छाजेड ई-लर्निंग इंग्लिश मिडियम स्कूल, बोपोडी या पुणे महानगरपालिकेच्या शाळेत मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, मात्र या शाळेत शिक्षकांची गंभीर कमतरता आहे.
शाळेकडे वारंवार तक्रारी करूनही काहीच निष्पन्न न झाल्याने संबंधित पालकांनी आम आदमी पार्टी महिला आघाडीच्या उपाध्यक्षा ॲनी अॅनीश आणि संघटन मंत्री विकास चव्हाण यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्या मागणीची दखल घेत AAP नेते श्रीमती शितल विश्वनाथ कांडेलकर (शहर अध्यक्षा – शिक्षक आघाडी), ॲनी अॅनीश, विकास चव्हाण आणि श्री शंकर थोरात (शहर उपाध्यक्ष) यांनी शाळेची पाहणी केली.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत AAP टीमने पालक अंजली संतोष दिघे, विलास मोरे, संतोष दिघे आणि पवन मित्तल यांच्या सोबत पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागात भेट देऊन प्राथमिक शिक्षण उपायुक्त श्री. विजयकुमार थोरात यांच्याशी सद्यस्थितीवर चर्चा केली. तसेच कै. पतासीबाई छाजेड ई-लर्निंग इंग्लिश मिडियम स्कूल, बोपोडी येथे विद्यार्थ्यांची गळती थांबवण्यासाठी पुरेसे शिक्षक नेमण्याची लेखी मागणी सादर केली.
श्री. विजयकुमार थोरात यांनी तात्काळ एका शिक्षकाची नियुक्ती केली जाईल, असे आश्वासन दिले, तसेच कंत्राटी शिक्षकांच्या भरतीची प्रक्रिया सुरू असून लवकरच नियमित शिक्षकांचीही नेमणूक केली जाईल, असे सांगितले.
आम आदमी पार्टीने इशारा दिला आहे की, जर ही समस्या तात्काळ सोडवण्यात आली नाही, तर पुणे शहरातील सर्व PMC शाळांना भेट देत शिक्षकांच्या भरतीसाठी आंदोलन करण्यात येईल.