
येमेनमध्ये फाशीपर्यंत कशी पोहोचली केरळची निमिषा; सरकार वाचवू शकेल ?
केरळमधील एक कुटुंब अजूनही खोल निराशेत बुडालेला आहे. एक रिक्षाचालक आपल्या पत्नीचा जीवाची भीख मागत आहे. येमेनमध्ये हत्या प्रकरणात दोषी असल्याचं सांगितलेली भारतीय नर्स निमिषा प्रिया हिला 16 जुलै रोजी फाशी दिली जाणार आहे.
हे रोखण्यासाठी भारताकडून प्रयत्न केले जात आहेत. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे खासदार जॉन ब्रिटासनेदेखील परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना पत्र लिहून त्यांना यमनमध्ये वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांसह संपर्क करीत निमिषाच्या फाशीची शिक्षा रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहे.
क्लिनिक सुरू करण्याचं स्वप्न अन् फाशीचा रस्ता…
केरळमधील पलक्कड जिल्ह्यातील कोल्लेनगोडे येथे राहणारी निमिषा प्रिया रोजंदारीवर काम करणाऱ्या आई-वडिलांना सपोर्ट करण्यासाठी पती आणि मुलीसह 2008 मध्ये यमन येथे गेली. मात्र पती आणि मुलगी आर्थिक कारणामुळे 2014 मध्ये भारतात परतल्या. त्याच वर्षी येमेनमध्ये यादवी युद्ध सुरू झाले होते आणि देशाने नवीन व्हिसा देणे बंद केल्यामुळे ती परत जाऊ शकत नव्हती. यादरम्यान वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये काम केल्यानंतर, निमिषा भागीदारीत स्वतःचं क्लिनिक उघडू इच्छित होती.
2015 मध्ये निमिषाने सनामध्ये स्वत:चं क्लिनिक स्थापन करण्यासाठी एक येमेनी नागरिक, तलाल अब्दो मेहदीसोबत हातमिळवणी केली. निमिषाला मेहदीची मदत घ्यावी लागली कारण येमेनी कायद्यानुसार फक्त येमेनी नागरिकांनाच क्लिनिक आणि व्यावसायिक कंपन्या सुरू करण्याची परवानगी आहे. २०१५ मध्ये मेहदी निमिषासोबत केरळला आला होता. त्यावेळी निमिषा एक महिन्याच्या सुट्टीवर भारतात आली होती. यात्रेदरम्यान त्याना निमिषाचा लग्नाच्या वेळेसचा एक फोटो चोरला. ज्यानंतर त्याने फोटो एडिट केला आणि माझं लग्न निमिषासोबत झाल्याचा दावा करायचा प्लान होता.
निमिषाची आई प्रियाने दाखल याचिकेत सांगितलं होतं की, काही वेळानंतर निमिषाचं क्लिनिक सुरू झालं. मात्र मेहदीने क्लिनिकच्या स्वामित्वाच्या कागदपत्रात फेरफार केला. निमिषा ही त्याची पत्नी आहे हे सर्वांना सांगून तो तिच्या मासिक कमाईतून पैसे उकळू लागला. निमिषाने आरोप केला होता की मेहदी तिला आणि तिच्या कुटुंबाला वर्षानुवर्षे त्रास देत होता. मेहदीने तिचा पासपोर्टही स्वत:कडे ठेवत होता. त्याने ड्रग्जच्या नशेत तिचा छळ केला. त्याने तिला अनेक वेळा बंदुकीच्या धाकावर धमकावले. त्याने क्लिनिकमधून सर्व पैसे आणि तिचे दागिने हिसकावून घेतले होते.
निमिषाच्या आईने आपल्या याचिकेत पुढे सांगितलं की, मेहदीशी लढण्यासाठी निमिषाने पोलीस ठाण्यात तक्रार केली. मात्र पोलिसांनी मेहदीविरोधात कारवाई करण्याऐवजी निमिषाला अटक केली. सहा दिवस ती तुरुंगात होती. जुलै २०१७ मध्ये, निमिषाने तिच्या क्लिनिकजवळील एका तुरुंगाच्या वॉर्डनची मदत घेतली. वॉर्डनने मेहदीला भूल द्यावी आणि नंतर त्याला त्याचा पासपोर्ट देण्यास राजी करावे असे सुचवले.
मात्र त्या ड्रग्सचा मेहदीवर काहीच परिणाम झाला नाही. निमिषाने पासपोर्ट मिळविण्यासाठी हाय डोज देऊन त्याला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला. मात्र औषधाचं प्रमाण अधिक असल्याने काही मिनिटात त्याचा मृत्यू झाला. यानंतर २०१८ मध्ये येमेन सोडण्याच्या प्रयत्नात असताना निमिषा प्रियाला अटक करण्यात आली आणि तिला हत्येचा दोषी ठरवण्यात आले. 2020 मध्ये न्यायालयाने हत्या प्रकरणात तिला मृत्युदंडाची शिक्षा सुनावली.
निमिषा वाचू शकेल का?
भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) चे राज्यसभा खासदार जॉन ब्रिटास यांनी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना पत्र लिहून निमिषा प्रियाला वाचवण्यासाठी त्वरित हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे.