
दैनिक चालू वार्ता माजलगाव प्रतिनिधी- नाजेर कुरेशी दि.09.07.2025
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनु. जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष तथा बहुजन विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे सचिव तथा आंबेडकरी चळवळीचे सामाजिक कार्यकर्ते दत्ता कांबळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त विविध सामाजिक उपक्रम राबावण्याची परंपरा सातत्याने कायम राखली.
आंबेडकरी चळवळीचे सामाजिक कार्यकर्ते हे अखिल भारतीय काँग्रेसच्या नेत्या खासदार सौ. रजनी ताई पाटील माजी मंत्री अशोकराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने सामाजिक उपक्रम राबावण्यात अग्रेसर असतात. अलीकडे जिल्हा परिषद शाळा ही सर्व सामान्य लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे, जिल्हा परिषद शाळा वाचली पाहिजे ही भूमिका घेऊन सामाजिक कार्यकर्ते दत्ता कांबळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त तब्बल १००० विध्यार्थ्यांना शालेय साहित्य वितरण कारण्यात आले. सुलतानपूर, वारोळा, मालिपारगाव, नित्रूड, गोविंदवाडी, महातपुरी, सुरूमगाव, पुनणंदगाव, ब्रम्हगाव, शेलापुरी, जामगा तांडा, यळा तांडा, चाहूर तांडा, कुरण तांडा, झिजूर्डी तांडा, बाराभाई तांडा,येथील जिल्हा परिषद शाळा अंतर्गत प्रति विध्यार्थी एक रजिस्टर असे एकूण एक हजार(१०००) विध्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी सदरील सामाजिक उपयोगी उपक्रमा दरम्यान जिल्हा परिषद शाळा वाचवण्यासाठी अनेक मोठ्या क्षमतेच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढे यावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते दत्ता कांबळे यांनी याप्रसंगी केले.हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बळीराम कारके,सोसिअल मीडिया जिल्हाध्यक्ष सुधाकर कांबळे,तालुका संघटक अक्षय थोरात, सामाजिक कार्यकर्ते अभिजित देडे, पत्रकार अनंत घडसिंगे,कृष्णा शिंदे, श्रीमंत कांबळे, सामाजिक कार्यकर्ते दिनेश आवाड, सामाजिक कार्यकर्ते मिलिंद मुजमुले,राजेभाऊ खंडागळे,आर. के. समूहाचे रुद्रा कासार, संकेत कासार, सामाजिक कार्यकर्ते विजय राठोड, सरपंच संतोष जाधव, सामाजिक कार्यकर्ते विलास लोंढे, मुकुंद हिवाळे,भरत काळे, गोपाल लोखंडे,यांनी हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम केले. तसेच यावेळी प्रत्येक गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य सह स्थानिक प्रतिष्ठित नागरिक व शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष, मुख्याध्यापक व सहशिक्षक सह प्रमुख कार्यकर्ते व मित्रपरिवार उपस्थित होते.