
अमित शाहांसोबतच्या चर्चेची इनसाईड स्टोरी आली समोर !
पावसाळी अधिवेशन सुरू असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे घाई घाईने बुधवारी सायंकाळी अचानक दिल्ली दौऱ्यावर गेले. राज-उद्धव ठाकरेंच्या युतीची चर्चा सुरू असताना शिंदेंनी अचनाक दिल्ली दौऱ्या केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.
मात्र, एकनाथ शिंदे यांनी दिल्ली दौऱ्या नेमका कशासाठी केला याची इनसाईड स्टोरी समोर आली आहे.
शिंदेंनी ठाकरे बंधूंच्या युतीचा धसका घेतला आहे. या विषयीच आणि आगामी स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीत काय रणनीती आखावी यासाठी चर्चा करण्यासाठी अमित शाहांनी दिल्लीत भेटल्याचे समोर आले आहे.
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या पार्श्वभूमीवर निवडणूक लांबणीवर टाकता येते का? याची चाचपणी देखील शिंदेंनी या दौऱ्यात केली. तसेच ठाकरे बंधू एकत्र येत असताना त्यांना टार्गेट केले तर महायुतीच्या मागे हिंदी मतदार ठामपणे उभा राहील का? याची चाचपणी देखील करण्यात आली असल्याची माहिती आहे.
ठाकरे बंधूंना घेरण्याची रणनीती
अमित शहा यांच्यासोबत ठाकरे बंधू एकत्र येत असताना विविध पर्यायावर शिंदेंनी चर्चा केल्याची माहिती आहे. निवडणूक लांबणीवर टाकण्यापासून महायुतीसोबत आणखी कोणत्या छोट्या पक्षांना सोबत घेता येईल. हिंदी पट्ट्यातील नेते मराठी विरोधात जी विधाने करतायेत त्यांना वाद टाळता येईल का? त्या विधानांचा संभाव्य परिणाम ठाकरे बंधूंना घेरण्यासाठी आणि हिंदी मतदारांना एकत्र येण्यासाठी कसा करता येईल या दृष्टीने ठाकरे बंधूंना घेरण्याची रणनीती ठरल्याची माहिती आहे.
शहांनी राज ठाकरेंची भूमिका समजून घेतली
राज ठाकरे यांचा त्रिभाषा सुत्राला नेमका विरोध का आहे? आणखी कोण कोण याला विरोध करत आहे. याबाबत राज ठाकरे यांची नेमकी भूमिका काय आहे? याची माहिती अमित शाह यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडून घेतली. तसेच शिंदेंच्या काही मंत्र्यांच्या वक्तव्यामुळे वाद होत आहेत ते टाळण्याचा सल्ला देखील शहांनी एकनाथ शिंदेना दिला.