
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- स्वरूप गिरमकर
( पुणे ) वाघोली : परमपूज्य गुरुमाऊली व आदरणीय गुरुपुत्रांच्या कृपाशीर्वादाने पुणे जिल्हा मार्गदर्शक आदरणीय सतीश दादा मोटे साहेब मार्गदर्शनाखाली अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये वाघोली सेवा केंद्रात श्री गुरु पौर्णिमेचा श्री गुरुपूजन सोहळा यथा सांग पार पडला.सकाळी साडेसहा वाजता भाग्यवान भाविक सेवेकरांनी श्री स्वामी समर्थ महाराजांची शोडशोपचार पूजा केली.आठ वाजता भूपाळी आरती नंतर प्रत्यक्ष गुरुपूजनाला सुरुवात झाली. यामध्ये रात्री ११ वाजेपर्यंत तब्बल ३०००+ भाविक सेवेकऱ्यांनी स्वामींचे गुरुपूजन करून गुरूपद घेतले.दिवसभरामध्ये चार बॅचमध्ये श्री स्वामी समर्थ मंत्र जप व श्री स्वामी चरित्र सारामृत सामुदायिक पाठाचे नियोजन केंद्रात केले होते.सायंकाळी साडेसहाच्या महानैवेद्य आरतीला भाविकांची अलोट गर्दी स्वामींच्या दर्शनाला लोटली होती.