
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी-एकनाथ गाडीवान
देगलूर. तालुक्यातील जुना बसस्थानक हे तेलंगाना व कर्नाटक या दोन राज्याच्या सीमेवरती जोडलेला आहे. शिक्षणासाठी ग्रामीण भागातून ये-जा करणारे विद्यार्थी,कर्मचारी, प्रवासांची संख्या अधिक असल्यामुळे बस स्थानकामध्ये कुठल्याही प्रकारची सुविधा नसून, बस स्थानकाची अवस्था खूपच बिकट झाली आहे. सतत होणाऱ्या पावसामुळे बस स्थानक नव्हे, तर तळ्याचे स्वरूप निर्माण झाले आहे. पाऊस पडला की बस स्थानकामध्ये तळ्याचे स्वरूप निर्माण होणारच. सदर बसस्थानकातील परिस्थिती खूप बेताची ठरली असून,मात्र तेथील हे चित्र दरवर्षी प्रमाणे ठरले असून, बस स्थानकांत होणारे गैरसोय व उपाययोजना एस.टी. प्रशासन कधी करणार प्रवासांचे,विद्यार्थ्यांचे होणारे हाल बेहाल कधी थांबणार, या गोष्टीकडे सर्वांचे लक्ष वेधले असून, स्थानिक प्रशासन यावर लवकरात लवकर उपायोजना करावे.अशी प्रवाशांनी व नागरिकांनी आशा वर्तवली आहे.एस.टी.च्या देगलूर आगाराच्या व्यवस्थापकापासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत सातत्याने दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.