
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- स्वरूप गिरमकर.
( पुणे ) वाघोली : श्री भैरवनाथ विद्यालय करड़े या विद्यालयाचे दोन विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी २०२५ मध्ये जिल्हा गुणवत्ता यादिमध्ये झळकले. इयत्ता पाचवीचे 16 पैकी 9 विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरले आहेत. तसेच 5 वी ची कु.पावणी शरद लंघे ही जिल्हा गुणवत्ता यादिमध्ये 250 गुणांसह (जे -४६३/६९२) स्थान मिळवून शिष्यवृत्तीस पात्र ठरली आहे.तर
आठवी शिष्यवृत्ती परीक्षे मध्ये १३ पैकी ६ विद्यार्थी पात्र ठरले असून चि. तेजस विजय घुले हा २३४ गुणांसह जिल्हा गुणवत्ता यादिमध्ये (जे -२५४/५६६) स्थान मिळवून शिष्यवृत्तीस पात्र ठरला आहे.विद्यालयाचे प्राचार्य श्री गोवंडे सर यांनी सर्व पात्र विद्यार्थ्यांचे व पाचवीच्या मार्गदर्शक शिक्षिका सौ वर्षा निलेश पवार तसेच आठवी चे मार्गदर्शक शिक्षक श्री काळे एस. आर, श्री होलगुंडे सी. एम. व श्री सरोदे एम. डी, श्री गट बी. सी. यांचे अभिनंदन केले.