
दैनिक चालु वार्ता उस्माननगर प्रातिनिधी -लक्ष्मण कांबळे
नांदेड / उस्माननगर :- गुरुपौर्णिमा हा अतिशय महत्त्वपूर्ण दिवस मानला जातो तो विविध पद्धतीने साजरा केला जातो बौद्ध संस्कृतीमध्ये या दिनास अनन्यासाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे या संस्कृतीत अडीच हजार वर्षाचा इतिहास लाभलेला आहे तसेच बौद्ध संस्कृतीमध्ये वर्षातील येणाऱ्या सर्व पौर्णिमेस एक विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
आजच्या या मंगल दिनापासून म्हणजे आषाढी पौर्णिमेपासून वर्षावास प्रारंभ असतो तो आश्विन पौर्णिमेस पूर्ण होतो हा महत्त्वाचा काळ मानला जातो आणि त्याच दिनाची महत्त्वाची दुसरी घटना म्हणजे आषाढी पौर्णिमेलाच बुद्धांनी पाच पर युवराज झकास सारनाथ येथे प्रथम धम्मोपदेश करून गुरु शिष्यास प्रारंभ केला तो ऐतिहासिक कालखंड म्हणजे इ.स.पू. ५२८ हा होय.
बुद्धाला ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्यांनी आपल्या धम्म मार्गाची रूपरेषा निश्चित केली ते स्वतःशीच म्हणाले नव्या तत्त्वज्ञानाचा मला लाभ झाला आहे हे खरे पण सामान्य माणसाला हे तत्व मान्य होतील का ते अनुकरण करतील का? बुद्धिमान लोकांना ते तत्त्वज्ञान सहजासहजी कळेल काय असे विविध प्रश्न त्यांच्या मनात रेंगाळत होते.
पण त्यांना प्रश्न पडला की हा धम्म उपदेश प्रथम कोणाला द्यायचा लगेच त्यांना या क्षेत्रातील दिग्गज आधार कालाम यांचे स्मरण झाले पण त्यांचा मृत्यू झाला असे कळाले तेव्हा त्यांनी पुन्हा शोध घेतला त्यांनी उद्योग यास धम्मोपदेश देण्याचा विचार केला पण त्यांचाही मृत्यू झाला होता आता शेवटी त्यांना स्मरण झाले ते त्यांच्यासोबत असणाऱ्या पाच परिवराजकांचे जे की निरंजना नदीकाठी त्यांच्या सोबत होते तेव्हा त्यांनी काया कशाचा मार्ग त्यागला तेव्हा संत्राप्त होऊन त्यांचा त्याग केला होता आणि म्हणून ते पाचही परिवराजक बुद्धापासून दूर झाले होते पण त्यांनी बुद्धासाठी खूप काही केले होते त्यांची सेवा केली होती म्हणून त्यांना उपदेशासाठी त्यांनी पात्र समजले या पाच जणांची त्यांना चौकशी केली असता ते वाराणसी जवळ सारणात येते ऋषी पतन च्या मृगवनात ते आहेत असे कळाले त्यांच्या शोधात ते गया येथून पायी चालत निघाले तेव्हा बुद्ध सारनाथ येथे पोहोचले तेव्हा त्या पाचही परिवराजकांनी न बोलण्याचे आणि स्वागत न करण्याचे ठरवले.
पण बुद्ध जसे जसे त्यांच्याजवळ येत होते तसे तसे त्यांच्या मनामध्ये परिवर्तन होत होते कारण बुद्धाच्या त्या बुद्धी त्याच्याकडे ती आकर्षित होत होते आणि आपोआप बुद्धाच्या स्वागतासाठी ते कार्यरत होत होते लगेच त्यांनी व बुद्धाचे अस्थिवायकपणे स्वागत केले त्यांना बसण्यास आसन दिले आणि अभिवादन केले नंतर भगवान बुद्धांनी कॉन्डिन य, अश्वजीत, वप, महानाम, आणि भद्य य, पाच परिवराज झकास धम्मोपदेश दिला हा जगातील पहिला धम्म प्रदेश मानला जातो. तेव्हापासून बुद्ध पौर्णिमा किंवा गुरुपौर्णिमा ही साजरी केली जाते.
आजही जगाच्या पाठीवर बहुतांश देश बुद्धमय झालेले आपण पाहतो त्यात जपान, चीन श्रीलंका भूतान तिबेट म्यानमार, थायलंड, व्हिएतनाम इत्यादी देशात बुद्धाचे तत्त्वज्ञान असून ते प्रगत झालेले आहेत.
विश्वाला शांतीचा संदेश देणारे एकमेव बुद्ध हेच ओळखले जातात म्हणजेच विश्वगुरू म्हणून त्यांचा नाम उल्लेख सार्थ ठरतो.
या कार्यक्रमांमध्ये बौद्ध महिलातील उपासक आणि उपाशीका मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता खीरदान झाल्यानंतर करण्यात आली.