दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे
जालना
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिनांक ६ मे, २०२५ते० २ऑक्टोबर,२०२५ या कालावधीत १५० दिवसांचा कार्यक्रम राबविण्याची घोषणा केली आहे. त्यामध्ये विकसित महाराष्ट्र-2047 करिता Vision Document तयार करण्याचा समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाची प्रचलित कार्यपध्दती अधिक लोकाभिमुख, पारदर्शी आणि सहजसुलभ (User Friendly) होण्यासाठी कोणत्या प्रकारच्या धोरणात्मक बाबी असाव्यात, याबाबत जिल्ह्यातील नागरिकांचे अभिप्राय घेण्यात येणार आहे. राज्यशासनाच्या निर्देशानुसार ‘विकसित महाराष्ट्र 2047’ साठी जनसहभाग वाढवण्याकरीता जालना जिल्हा प्रशासनामार्फत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. ‘विकसित महाराष्ट्र 2047’ या राज्य शासनाच्या दूरदृष्टीपूर्ण अभियानाच्या पार्श्वभूमीवर, जालना जिल्ह्यात स्थानिक पातळीवरील थेट प्रतिसाद आणि व्यापक जनसहभाग सुनिश्चित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष जनजागृती मोहीम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही मोहीम जिल्ह्याच्या प्रत्येक भागात / क्षेत्रात पोहोचवण्यासाठी पुढील माध्यमांचा प्रभावी वापर करुन जिल्ह्यातील नागरिकांना या विशेष मोहिमेत सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे.
जिल्हा प्रशासनामार्फत या मोहिमेची माहिती विविध माध्यमातून जिल्ह्यातील सर्व नागरिकांपर्यंत पोहचविण्यात येत आहे. यामध्ये सर्व शासकीय कार्यालयांच्या समोर माहिती फलक लावण्यात येणार आहे. तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक, आंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स नगर परिषद मुख्याधिकारी व शहरी प्रशासनाचे सक्रीय सहकार्य विद्यार्थी व तरुण वर्ग यांचा सक्रीय सहभाग सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचा वैयक्तिक सहभाग बचतगट, शेतकरी उत्पादक संस्था (FPO), आदिवासी बचत गट, DDR सहकारी संस्था स्थापत्य अभियंते, डॉक्टर्स, उद्योजक, सामाजिक संस्था इत्यादींना या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे जालना जिल्ह्यातील प्रत्येक घटकाचा आवाज शासनापर्यंत पोहोचवणे आणि जिल्हा विकास प्रक्रियेत सर्वांचा सहभाग सुनिश्चित करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील नागरिकांना या सर्वेक्षणात सहभागी होण्यासाठी विविध माध्यमातून प्रोत्साहित करुन आवाहन करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या क्युआर कोड व लिंक वरून नागरिकांना या सर्वेक्षणात सहभागी होता येणार आहे. सर्व नागरिकांनी या सर्वेक्षणात सहभागी होऊन ‘विकसित महाराष्ट्र 2047’ बाबत आपली संकल्पना व आकांक्षाबाबत राज्य शासनाच्या संकेतस्थळावर दिलेल्या Link – https://wa.link/o9359m या लिंकवर तसेच क्यूआर कोड वरुन व्हॉटस्अप चॅटबॉटद्वारे आपला प्रतिसाद द्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे.