
दैनिक चालू वार्ता उपसंपादक धाराशिव-नवनाथ यादव
धाराशिव/भूम (प्रतिनिधी):
भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र राज्य परिषद सदस्यपदी मा. बाळासाहेब क्षीरसागर यांची निवड झाल्याने भूम तालुक्याच्या राजकीय आणि सामाजिक पातळीवर आनंदाचे वातावरण आहे. त्यांच्या या यशस्वी निवडीबद्दल लहुजी शक्ती सेना, भूम तालुका यांच्या वतीने भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले.
या वेळी सेनेचे धाराशिव जिल्हा युवक अध्यक्ष प्रा. दत्ता बबन साठे, युवक तालुका उपाध्यक्ष विजय भाऊ गायकवाड, तिंत्रज शाखा अध्यक्ष बाळासाहेब कांबळे, इट शाखा उपाध्यक्ष अमोल खवळे, सचिव सुनील गायकवाड, भूम शहर उपाध्यक्ष कांतीलाल साठे, भूम शाखा अध्यक्ष श्रीराम साठे यांनी त्यांचा पुष्पगुच्छ व शाल श्रीफळ देऊन सन्मान केला.
कार्यक्रमास शुभम साठे, भारत आडागळे, सामाजिक कार्यकर्ते हेमंत शिंदे, आकाश इजगज, यशराज चव्हाण, विनोद गायकवाड, कृष्णा गायकवाड, आकाश गायकवाड, वैभव गायकवाड, सनिराज गायकवाड, अविनाश पटेकर, शंतनू थोरात आणि अहिरे सर आदी कार्यकर्त्यांची विशेष उपस्थिती होती.
या वेळी क्षीरसागर यांनी लहुजी शक्ती सेनेच्या संघटनेबद्दल आस्था व्यक्त करत पुढील काळात त्यांच्या कार्याला राजकीय पाठबळ देण्याचे आश्वासन दिले. “तरुण पिढीने सामाजिक बांधिलकी जपत राजकारणात सकारात्मक पाऊल टाकावे,” असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे आयोजन प्रेरणादायी ठरले असून, तालुक्यातील विविध शाखांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सेनेने दाखवलेला सन्मान हा केवळ एका नेत्याचा गौरव नसून, तो भूमच्या जनतेच्या स्वाभिमानाचा सन्मान आहे.