
कर्नाटक राज्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घनदाट जंगलात एका अजब घडलंय. खरं म्हणजे या गुहेत एक रशियन महिला सापडली आहे. कर्नाटकमध्ये राबवण्यात आलेल्या सर्चऑपरेशनमध्ये एका धोकादायक आणि भयान अशा गुफेत ही रशियन महिला आढळून आली आहे.
तिला पाहताच सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. ती नेमकी कोण आहे? असा सवाल आता उपस्थित झाला आहे.
नेमकं प्रकरण काय आहे?
मिळालेल्या माहितीनुसार समोर आलेला हा प्रकार कर्नाटकमधील गोकर्ण येथील आहे. या भागातील रामतीर्थ नावाच्या डोंगरावर एक दुर्गम अशी गुहा आहे. या गुहेत एक रशियन महिला तिच्या दोन मुलींसह दिसून आली आहे. पेट्रोलिंग करत असताना या महिलाचा सुगावा लागलाय. विशेष म्हणजे तिने या गुहेत एक घरही तयार केलं होतं. 9जुलै रोजी सध्याकाळी हा प्रकार समोर आला आहे.
सगळा प्रकार समोर कसा आला?
गोकर्ण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक क्षीधर एसआर आणि त्यांची एक टीम पर्यटक सुरक्षित आहेत की नाही, हे तपासण्यासाठी रामतीर्थ डोंगरावर गस्तघालत होते. यावेळीसर्चऑपरेशनदरम्यान त्यांना एका अतिशय धोकादायक अशा लँडस्लाईडजवळच्या गुहेत काही हालचाली दिसल्या. त्यानंतर त्यांनी त्या गुहेच्या परिसरात सर्चऑपरेशन राबवलं. या शोधमोहिमेनंतर त्या गुहेत नीनाकुटीना नावाची एक 40 वर्षीय रशियन महिला आढळली. तिच्यासोबत एक सहा वर्षांची प्रेमा तर चार वर्षांची एमा अशा दोन मुलीही होत्या.
गुहेत नेमकं का राहात होती?
तिला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी तिची चौकशी केली. तिच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. ती अध्यात्मिक एकांताच्या शोधात गोव्यातून गोकर्ण येथे आली होती. ध्यान धारणेत रममाण होण्यासाठी ती शहरापासून दूर गुहेत राहात होती. ही महिला ज्या ठिकाणी राहात होती, त्या भागात 2024 साली भुस्खलन झाले होते. या भागात विषारी साप आहेत. तसेच जंगली प्राणीदेखील आहेत.
महिला जपानलाही गेली होती
गोकर्ण पोलीस तसेच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी एक संयुक्त शोधमोहीम राबवली. या मोहिमेत अधिकाऱ्यांना रशियन महिलेचा पासपोर्ट, व्हिजा तसेच इतर कागदपत्रे मिळाली आहेत. ती 17 एप्रिल 2017 सालापासून भारतात वास्तव्यास असल्याचे समोर आले आहे. रेकॉर्ड्सनुसार ती नेपाळलाही गेली होती. तेथून ती 8डिसेबर2018 साली भारतात आली होती.
दरम्यान, आता या महिलेची सखोल चौकशी केली जात आहे. तिला परत रशियात पाठवण्यासाठी प्रक्रिया चालू करण्यात आली आहे.