
रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरु आहे. हे युद्ध दिवसेंदिवस तीव्र होत चालले आहे. अशाचत आता रशिया आणखी एका देशावर हल्ला करणार असल्याची माहिती समोर आली आहे. अझरबैजान असे या देशाचे नाव आहे.
पुतीन इराणच्या मदतीने अझरबैजानला धडा शिकवण्याची तयारी करत आहेत. कॅस्पियन समुद्रात इराण आणि रशियाकडून युद्ध सरावालाही सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता आणखी एक युद्ध पेटण्याची शक्यता आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, रशिया आणि अझरबैजानमधील संबंध बिघडले आहेत. सध्या इराणी नौदल, आयआरजीसी आणि रशियन नौदल युद्धाची तयारी करत आहे. अझरबैजानचे अध्यक्ष इल्हम अलीयेव यांनी रशियाबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. प्रवासी विमान पाडल्याच्या घटनेबाबत रशियाविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाणार असल्याचे अलीयेव यांनी म्हटले आहे.
रशिया युद्धासाठी तयार
रशिया आणि अझरबैजान या दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे, त्यामुळे आता पुतीन हे युद्धाची तयारी करत असल्याची माहिती समोर आले आहे. युद्धाचे समर्थन करणारे ब्लॉगर दिमित्री सेलेझ्न्योव्ह यांनी म्हटले की, ‘अझरबैजान रशियाला उघडपणे विरोध करत आहे, ते जितक्या लवकर युद्ध सुरु करतील तितके ते चांगले असेल.’ तसेच ब्लॉगर युरी कोटेनेक यांनीही इल्हम अलीयेव हे अहंकारी हुकूमशहा आहेत, त्यांनी धडा शिकवण्याची वेळ आली असल्याचे विधान केलं आहे.
अझरबैजानला पराभव होऊ शकतो
जागतिक अभ्यासकांचे असे म्हणने आहे की, रशिया आणि अझरबैजान यांच्यात युद्ध झाले तर अझरबैजानला मोठा पराभव पत्करावा लागेल. हायर विद्यापीठाचे प्राध्यापक दिमित्री युस्ताफिएव्ह यांनी म्हटले की, 20 जुलै रोजी पुतीन आणि इराणी सल्लागार लारीजारी यांच्यात एक बैठक झाली. या बैठकीत हल्ल्याबाबत चर्चा झाली असे. या बैठकीतून हे स्पष्ट होते की जर युद्ध झाले तर इराण रशियाला पाठिंबा देईल. दुसरीकडे अझरबैजानचा मित्र तुर्कीची अवस्था सध्या वाईट आहे, त्यामुळे त्यांना मदत मिळणार नाही. जर्मन संशोधक निकोलाई यांनी सांगितले की, रशिया जॉर्जियामधून रशियन सैन्यासाठी एक कॉरिडॉर उघडण्याच्या तयारीत आहे, यामुळे अझरबैजानवर जमिनीवरून हल्ला करता येणार आहे.
इराण-रशियाच्या सरावामुळे अझरबैजान चिंतेत
इराण आणि रशियाचा एकत्र सराव हा अझरबैजानसाठी एक मोठा इशारा आहे. 21 जुलै रोजी सुरू झालेल्या या सरावाला काझारेक्स 2025 हे नाव देण्यात आले आहे. अझरबैजानच्या भूमिकेला उत्तर देण्यासाठी हा सराव करण्यात येत आहे. रशियन पत्रकार मॅक्सिम शेवचेन्को यांच्या मते कॅस्पियन प्रदेशात जवळजवळ युद्धाला सुरूवात झाली आहे. ब्लॉगर अलेक्सी यांच्यामते अझरबैजान रशियाविरुद्ध भूमिका घेत आहे, त्यामुळे हा आता रशियासमोर युद्ध हा एकमेव पर्याय उरला आहे.