
चर्चेत येण्यासाठी तलवारवाला बाबा’ची स्टंटबाजी; शिर्डीत नागरीक संतप्त व गुन्हा दाखल…
तलवारवाला बाबा म्हणून प्रसिद्ध असलेले हिंदू सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संत युवराज यांनी शिर्डीचे साईबाबांबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. त्यांच्या वादग्रस्त विधानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
त्यांनी देशभरातील हिंदू मंदिरांमधून साईबाबांची मूर्ती हटवण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या विधानामुळे साईभक्तांच्या भावना दुखावल्या जातात. या प्रकरणात त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. या व्हायरल व्हिडीओनंतर तलवार बाबांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हिंदू सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संत युवराज महाराज यांनी नुकतेच साईबाबांबाबतचा वादग्रस्त व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्यांनी देशभरातील हिंदू मंदिरांमधून साईबाबांची मूर्ती हटवण्याचे आवाहन केले आहे. ‘काही हिंदू मंदिरांमध्ये साईबाबांच्या मूर्ती आहेत. देशभरात साईबाबांची मंदिरे आहेत. सगळीकडे गल्ली गल्लीत साईंची मंदिरं आहेत. हिंदूंना काय झाले आहे. जुलैमध्ये या सर्व साईबाबांच्या मूर्ती हटवून टाका.
तसेच, ‘साईबाबांची मूर्ती हातोड्याने तोडून गटारात टाका. नदीत मूर्ती टाकून ती परत मिळेल असं करू नका. प्रत्येक मंदिरातून या मूर्ती हटवला. जर तुम्ही मूर्ती काढली नाही तर आम्ही त्या जबरदस्तीने हटवू. हे अभियान आम्ही फरिदाबाबमधून सुरू केले आहे. साईबाबा मुस्लिम होते ते मांसाहारी होते आणि व्यभिचारी होते. साईबाबा देव नाही. त्यांच्याशी आपला काहीच संबंध नाही.’, असे वादग्रस्त विधान त्यांनी केले.
संत युवराजांच्या व्हायरल व्हिडिओमुळे वादंग होण्याची शक्यता आहे. शिर्डी पोलीस ठाण्यात साईबाबा संस्थानकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. साईबाबांची बदनामी केल्याबद्दल त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. व्हायरल व्हिडिओनंतर शिर्डीतची संतप्त प्रतिक्रिया येथे आहे.
तर दुसरीकडे साईभक्तांसाठी दिलासादायक बातमी असून, साई संस्थेने या भाविकांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. साई मंदिरात ब्रेक दर्शन सुरू होत आहे. सामान्य दर्शन रांगेत उभ्या असलेल्या भाविकांना याचा फायदा मिळेल. साई संस्थानच्या या निर्णयामुळे सामान्य साई भक्तांना मोठा दिलासा मिळेल. यामुळे दर्शनासाठी रांगेत घालवला जाणारा वेळ वाचेल. व्हीआयपी दर्शनामुळे सामान्य साई भक्तांना होणारा त्रास आता कमी होईल. गर्दीत एक परिपूर्ण व्यवस्था निर्माण करण्यासाठी ब्रेक दर्शन सुरू करण्याचा निर्णय साई बाबा संस्थानने घेतला आहे. यामध्ये व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपींसाठी दर्शन सुविधेचा वेळ निश्चित करण्यात आला आहे. श्री साईबाबा संस्थान ट्रस्टचे विद्यमान सीईओ (मुख्य कार्यकारी अधिकारी) गोरक्ष गाडीलकर यांनी या निर्णयाची माहिती दिली.