
बडतर्फ वादग्रस्त भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीत. आता श्रीमती खेडकर हिला महसूल विभागाने दणका दिला आहे. या दणक्याने खेडकर हिची नियुक्तीच कायमची रद्द होऊ शकते.
वादग्रस्त पूजा खेडकर हिला प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी म्हणून पुणे येथे नियुक्ती देण्यात आली होती. या ठिकाणी त्या बीएमडब्ल्यू या महागड्या गाडीतून कार्यालयात येत होत्या. सहकारी अधिकाऱ्यांना त्रास दिला होता आरोप त्यांच्यावर होता. त्यामुळे त्यांना बडतर्फ करून चौकशीचे आदेश देण्यात आले होते.
भारतीय प्रशासन सेवेतील पूजा खेडकर विचार जात प्रमाणपत्रासाठीचे क्रिमी लेयर प्रमाणपत्र केंद्र शासनाने विभागीय महसूल आयुक्तांकडे तपासणीसाठी पाठविले होते. पडताळणी प्रमाणपत्र नोकरीसाठी आवश्यक असते. हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी पूजा खेडकर यांनी बनावट कागदपत्र सादर केली होती तसेच खरी माहिती लपवली अशी तक्रार होती यासंदर्भात नाशिकच्या विभागीय आयुक्तांकडे प्रमाणपत्र रद्द करण्याबाबत प्रकरण सुरू होते.
या प्रकरणात विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी पूजा खेडकर हिचे क्रिमी लेअर प्रमाणपत्र रद्द केले आहे. हे प्रमाणपत्र रद्द केल्यामुळे वादग्रस्त पूजा खेडकर हिला मोठा दणका बसला आहे. या प्रमाणपत्राच्या आधारे खेडकर हिने यूपीएससीचे परीक्षा देऊन नियुक्ती प्राप्त केली होती आता ही नियुक्ती रद्द होण्याची चिन्ह आहेत.
या संदर्भात खेडकर हिने मंत्रालयात महसूल सचिव आबासाहेब धुळे यांच्याकडे दाद मागितली आहे. नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्रासाठी कुटुंबाचे उत्पन्न कमाल सहा लाख अपेक्षित असते. ही माहिती खेडकर हिने लपवली होती. त्यांच्या कुटुंबीयांकडे २३ जंगम मालमत्ता, १२ वाहने असे ४० कोटींचं उत्पन्न आढळले होते. त्या आधारे हे प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहेत.
पूजा खेडकर ही २०२३ च्या बॅचची भारतीय प्रशासन सेवेत निवड झालेली अधिकारी आहे. तिच्याबाबत चौकशीत सदोष माहिती आढळल्याने महसूल विभागाने केंद्रीय लोकसभा आयोगाला माहिती पाठवली होती. त्या आधारे खेडकर हीची नियुक्ती रद्द करण्यात आली आहे.
याबाबत लोकसेवा आयोगाच्या निर्णयाच्या विरोधात खेडकर हीन सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेत खेडकर हिला जामीन मंजूर झालेला आहे. खेडकर आणि आयोगाचा खटला अद्याप सुरू आहे. विविध खटल्यांचा ससेमीरा तीच्या मागे लागला असल्याने पूजाचा पाय आणखी खोलात गेला आहे.