
दैनिक चालु वार्ता पालघर प्रतिनीधी -रवि राठोड
पालघर – जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींतील कंत्राटी व असंघटित कामगारांनी सात महिन्यांपासून थकीत वेतनाच्या विरोधात पालघर पंचायत समिती कार्यालयावर ठिय्या आंदोलन केले.
अविश राऊत यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकाऱ्यांची भेट घेऊन जाब विचारण्यात आला. समाधानकारक उत्तर न मिळाल्याने राष्ट्रीय पँथर्स आघाडीकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आला.
प्रकरण गांभीर्याने घेत मुख्य कार्यकारी अधिकारी रानडे यांनी 30 जुलै रोजी तातडीची बैठक बोलावली आहे. कामगारांना न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी शेकडो कामगारांसह महेश शेलार, सिद्धार्थ वाघमारे, पूजा कांबळे, अनुष्का शेलार, केतन मोरे आदी उपस्थित होते.