
दैनिक चालु वार्ता वर्धा – उपसंपादक – अवधूत शेंद्रे
—————————————-
अमरावती – वरुड :- अमरावती नजीक संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल रुग्ण सेवा आणि सुविधेच्या बाबती महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर असून सध्यास्तिथीत १४० बेड पूर्णतः भरून जातात हॉस्पिटल बिझनेस पॉइंट नसून केवळ संत अच्युत महाराज यांच्या कर्म, धर्म योगाने समाजसेवाच असल्याचे प्रतिपादन हॉस्पिटलचे सचिव माजी प्राचार्य सागर पासेबंद यांनी वरुड येथील ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य तपासणी शिबिरात आपले मत व्यक्त केले यावेळी मंचावर संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटलचे निवासी हृदयरोग तज्ज्ञ डॉ. शिवराज शिंदे, कार्यक्रमाचे अध्यक्ष पुरुषोत्तम गांवडे,दिलीपसिंह खांबरे,राजेंद्र दिगंबर, राजेंद्र पांधरे, शेषराव शिरसाट, बाळकृष्ण कोहळे, जी. टी.तायवाडे, ज्ञानेश्वर बहुरूपी, मृदुला पाटील, रामभाऊ केवटे, विजय चौधरी, डॉ.माधवी पाटील, डॉ.साची पाटील, डॉ. घोरपडे, डॉ. सौरभ आंडे, डॉ. शिप्रा भेले, डॉ. रंजना खोब्रागडे, डॉ. गायत्री, सामाजिक कार्यकर्त्यां प्रज्ञा मनवर उपस्थित होते पुढे बोलताना पासेबंद म्हणाले की,माणसाची घाई करण्याची वृत्ती हार्ट अटॅक मुव्हमेंट आहे म्हणून शांतपणे दिनचर्या असू द्या, जे होईल ते स्वीकारा एकदम विनोदी पद्धतीने एकूण १८ मिनिटे अनमोल मार्गदर्शन केले यावेळी पुरुषोत्तम गावंडे, श्रीकांत पाटील यांची मार्गदर्शनपर भाषणे झालीत सदर शिबिरात २५० लाभार्थ्यांनी सहभाग नोंदविला सदर ज्येष्ठानांचे आरोग्य तपासनी शिबीर आधार ज्येष्ठ नागरिक संघ वरुड, डॉ.माधवी पाटील चॅरिटेबल ट्रस्ट बहादा, डॉ. विकास महात्मे आय हॉस्पिटल नागपूर, सामान्य रुग्णालय अमरावती, ग्रामीण रुग्णालय वरुड यांचा संयुक्त विद्यमाने संपन्न झाले सदर कार्यक्रमाचे संचालन दिलीप देशपांडे यांनी तर आभार प्रदर्शन ज्ञानेश्वर बहुरूपी यांनी केले