
धक्कादायक व्हिडीओ व्हायरल; कारण ऐकून तुमच्याही डोळ्यांत येईल पाणी…
सोशल मीडियावर एका अंत्ययात्रेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. आता तुम्ही म्हणाल, मग यात काय विशेष? अहो, या व्हिडीओमधील लक्षवेधी बाब म्हणजे या प्रेतयात्रेत एक व्यक्ती ढोल-ताशाच्या तालावर नाचताना दिसत आहे.
एकीकडे लोक दु:ख व्यक्त करत असताना, दुसरीकडे एक व्यक्ती मनसोक्त नाचतोय. हा प्रकार थोडा अजबच आहे. पण या डान्समागचं खरं कारण जर तुम्ही ऐकाल, तर तुमचेही डोळे अश्रूंनी भरतील. तुम्हाला सुद्धा रडू आवरणं कठीण जाईल.
ही हृदयस्पर्शी घटना मध्य प्रदेशातील मंदसौर जिल्ह्यातील जवासिया गावात घडली आहे. एक व्यक्ती आपल्या जिवलग मित्राच्या अंत्ययात्रेत नाचतोय, कारण त्यानं आपल्या मित्राला तसं वचन दिलं होतं. सोहनलाल जैन हा व्यक्ती कर्करोगाशी झुंज देत होता. पण त्यानं अखेरच्या क्षणी आपल्या मित्राला एक खास पत्र लिहिलं आणि त्यामध्ये एक इच्छा व्यक्त केली.
तो म्हणाला, “माझ्या अंत्ययात्रेत कोणीही रडू नये. कोणीही मौन धारण करू नये. उलट ढोल-ताशाच्या तालावर नाचत मला आनंदानं निरोप द्यावा.
मित्राची ही शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी तो नाचत होता.
डान्स करणाऱ्या व्यक्तीचं नाव अंबालाल प्रजापती असं आहे. त्याचा डान्स पाहून गावकरी सुद्धा आधी गोंधळले होते. हे काय घडतेय, हे त्यांना कळत नव्हतं. त्यांनी सुरुवातीला या प्रकाराला विरोध सुद्धा दर्शवला होता. पण ती चिठ्ठी वाचल्यानंतर मात्र सर्वांच्याच डोळ्यांत पाणी आलं. या डान्सचा व्हिडीओ @jpsin1 या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत १ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला असून, अनेकांनी त्यावर भावुक प्रतिक्रिया दिल्या आहेत.