
मोफत रेल्वे प्रवासासह या व्हीआयपी सुविधा सुद्धा…
‘गदर’ फेम अभिनेता सनी देओल याला कोणत्या ओळखीची गरज नाही. सनी देओल हा बॉलिवूडचा सर्वात प्रतिभावान अभिनेता आहे. अभिनेत्याने स्वतःच्या कारकिर्दीत अनेक उत्तम सिनेमे बॉलिवूडवा दिले आहेत.
2023 मध्ये अभिनेत्याच्या ‘गदर 2’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, तर या वर्षी आलेला त्याचा ‘जात’ हा सिनेमा देखील हिट ठरला. सांगायचं झालं तर, सनी देओल केवळ त्याच्या सिनेमांमधून भरपूर कमाई करत नाही तर त्याला भारत सरकारकडून पेन्शन आणि इतर अनेक भत्ते देखील मिळतात.
खरंतर, सनी देओल हा पंजाबमधील गुरुदासपूरचा माजी लोकसभा खासदार आहे. सनी देओलला पेन्शन व्यतिरिक्त सरकारकडून इतर कोणत्या सुविधा मिळतात. सनी देओल याने 2019 मध्ये भाजपच्या तिकिटावर पंजाबमधील गुरुदासपूर येथून निवडणूक लढवली आणि विजयी झाला. अभिनेता 2019 ते 2014 पर्यंत लोकसभा खासदार (भाजप) होता. त्याचा कार्यकाळ नुकताच जून 2024 मध्ये संपला.
भारत सरकार सनी देओलला किती पेन्शन देते?
भारतात, माजी खासदारांना पूर्वी दरमहा 25 हजार रुपये पेन्शन मिळत होती. पण आता ती रक्कम 31 हजार रुपये करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत, सनी देओल याला भारत सरकारकडून दरमहा 31 हजार रुपये खासदार पेन्शन मिळत आहे.
सनी देओलला अनेक व्हीआयपी सुविधा मिळतात
पेन्शन व्यतिरिक्त, सनी देओलला भारत सरकारकडून अनेक व्हीआयपी सुविधा देखील मिळतात. त्याला आजीवन रेल्वे पास मिळतो. याद्वारे, तो आणि त्याचा एक साथीदार (पती/पत्नी किंवा सह-प्रवासी) फर्स्ट क्लास एसी किंवा एक्झिक्युटिव्ह क्लासमध्ये मोफत प्रवास करू शकतात. एवढंच नाही तर, माजी खासदार असल्याने, सनी देओल याला सरकारी लेटरहेड सारख्या मोफत टपाल सेवा आणि काही मर्यादित प्रमाणात मोफत पोस्ट/कुरियर सुविधा देखील मिळते.
दिल्लीतील अतिथीगृह सुविधा
दिल्लीमध्ये सरकारी कामासाठी किंवा वैयक्तिक कामासाठी मर्यादित निवास सुविधा देखील उपलब्ध आहे. सरकारी अतिथीगृहांमध्ये फक्त माजी खासदारांनाच कमी दरात खोल्या मिळू शकतात. म्हणजेच माजी खासदार सनी देओल याला देखील ही सुविधा मिळते. पूर्वी माजी खासदारांना फोन बिल आणि टेलिफोन लाईनची सुविधा मिळते. आता हे प्रमाण खूपच कमी झालं आहे.
सनी देओल याच्या आगामी सिनेमांबद्दल बोलायचं झालं तर, अभिनेता लवकरच बॉर्डर 2, लाहोर 1947 आणि रामायण भाग 1 आणि भाग 1 मध्ये दिसणार आहे. अभिनेत्याच्या या सिनेमांबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.