माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांचे पती डॉ. प्रांजल मनीष खेवलकर यांच्या बाबत तपासात दररोज धक्कादायक बाबी पुढे येत आहेत.
त्यांच्या मोबाईल आणि लॅपटॉपमध्ये हजाराच्या पुढे अश्लिल क्लिप आढळून आल्या असून पाचशे पेक्षा जास्त तरुणींशी संबंध ठेवल्याचे दिसत आहेत.
यातील काही क्लिप अतिक्षय आक्षेपार्ह असून कदाचित संबंधीत तरुणींवर अत्याचार केल्याचे दिसून येत आहे. मात्र सध्यातरी तपास फक्त ड्रगशी संबंधीत प्रकरणात सुरु असल्याची माहिती पोलीस दलातील सुत्रांनी दिली.
कर्नाटकात माजी पंतप्रधान देवगौडा याचे नातू प्रज्ज्वल रेवण्णा याच्याजवळ तब्बल २ हजार ९७६ लैंगिक शोषणाच्या क्लिप आढळून आल्या होत्या. याप्रकरणी नुकतीच त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. त्यानंतर कदाचीत एखाद्या राजकीय व्यक्तीच्या नातेवाईकाकडे इतक्या मोठ्या प्रमाणात क्लिप सापडण्याची ही दुसरी घटना असू शकते.
मात्र पोलिसांनी अद्याप तरी न्यायालयात क्लिप आणि तरुणींची आकडा सांगितला नाही. मात्र त्यांनी सूचकपणे अनेक अत्यंत आक्षेपार्ह व अशोभनिय व्हिडिओ आणि छायाचित्रे मिळून आल्याचे म्हटले आहे. तसेच ते आरोपीने गैरकृत्य व गैरहेतूने काढलेले म्हटले आहे.
डॉ.खेवलकर हा २७ जुलै रोजी खराडी येथील स्टेबर्ड हॉटेलमध्ये ड्रग्ज आणि मद्य पार्टी करताना पोलिसांच्या जाळ्यात सापडले. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
पोलिसांच्या तपासात धक्कादायक खुलासे
क्रिकेट सट्टा व्यापारी निखिल पोपटानी आणि इतर महिलांसह पार्टीमध्ये सहभाग डॉ. खेवलकरचा सहभाग आढळला होता. त्याने स्टेबर्ड हॉटेलमध्ये रुम बुकिंग, एकूण ४३ दिवस वास्तव्य केले आहे. विविध महिलांसोबत पार्टीनंतरचेही अश्लील फोटो आणि व्हिडिओ पोलिसांच्या ताब्यात आहेत. हे सर्व गैरकृत्य हेतुपुरस्सर चित्रीत केल्याचे प्राथमिक अंदाज.
महिला आयोगाने उचलले पाउल : तातडीची चौकशीचे आदेश
सानवी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या तक्रारीनंतर, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने याची गंभीर दखल घेतली आहे. आयोगाच्या म्हणण्यानुसार, खेवलकर यांनी तब्बल २८ वेळा परप्रांतीय महिलांना आमिष देऊन हॉटेलमध्ये बोलावले, आणि ही बाब मानवी तस्करीसारख्या रॅकेटकडे निर्देश करत आहे
