
ऑपरेशन सिंदूर नंतर, भारताच्या मैत्रीचा क्रम पूर्णपणे बदलला आहे. जे मित्रांच्या यादीत वर होते ते आता खाली घसरले आहेत. तर जे सर्वात खालच्या क्रमांकावर होते ते वर आले आहेत. या यादीत सर्वात मोठी नावे चीन, रशिया आणि अमेरिका आहेत.
मित्रांच्या यादीत वरच्या क्रमांकावर असलेला अमेरिका आता खाली घसरला आहे. त्याच वेळी, चीन वरच्या क्रमांकावर असल्याचे दिसून येते. पण सावधगिरी बाळगूनच, कारण जिनपिंग यांच्या देशावर भारत आंधळेपणाने विश्वास ठेवू शकत नाही. त्याच वेळी, रशियाशी भारताची मैत्री नेहमीच मजबूत राहिली आहे, तो या यादीत वरच्या क्रमांकावर आला आहे.
रशियन शस्त्रांनी पाकिस्तानचा पराभव
रशिया हा भारताचा नेहमीच मित्र आहे. प्रत्येक अडचणीत तो भारताच्या पाठीशी उभा राहिला आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने रशियन शस्त्रास्त्रांच्या मदतीने पाकिस्तानला ज्या प्रकारे पराभूत केले त्यामुळे हे संबंध आणखी मजबूत झाले आहेत. रशियाची हवाई संरक्षण प्रणाली S400 भारताच्या बाजूने उभी राहिली आणि अनेक पाकिस्तानी ड्रोन पाडले.
पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान रशिया केवळ भारतासोबत उघडपणे उभा राहिला नाही, तर ट्रम्पच्या टॅरिफवरील धमक्यांच्या पार्श्वभूमीवरही तो भारताला जोरदार पाठिंबा देत आहे.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प भारताला रशियाकडून तेल खरेदी करण्यापासून रोखत आहेत, परंतु मॉस्कोचं असं म्हणणं आहे की, ते कोणाशी काय व्यापार करते हे त्या देशावर अवलंबून आहे. भारत आणि रशियामधील मैत्रीत ट्रम्प हे दरी निर्माण करू इच्छितात, परंतु पुतिन आणि मोदी त्यांचे मनसुबे हाणून पाडत आहेत. उलट, दोघांमधील मैत्री अधिकच घट्ट होत चालली आहे.
टॅरिफबाबत ट्रम्प हे धमक्यांवर धमक्या देत असताना, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल मॉस्कोला पोहोचले आहेत. डोवाल रशियामध्ये संरक्षण आणि द्विपक्षीय संबंधांवर चर्चा करतील. ते मॉस्कोमध्ये येण्यापूर्वी, रशियाच्या उप-लष्करप्रमुखांनी भारतीय राजदूतासोबत बैठक घेतली. रशियाचे विधान आणि डोवाल याची ही भेट, हे नवी दिल्ली आणि मॉस्कोमधील वाढती मैत्री दर्शवते. ट्रम्प काहीही बोलले तरी त्यांच्या नात्यावर किंचितही परिणाम होणार नाही हेच दोघांची केमिस्ट्री दर्शवते.
अमेरिकेपेक्षा चीनला प्राधान्य
डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या वक्तव्यांनी भारत आणि अमेरिकेतील संबंध बिघडवले आहेत. ते भारत-पाकिस्तान युद्धबंदीचे श्रेय घेण्यात व्यस्त आहेत. त्यांना पाकिस्तानकडून आदर मिळत आहे पण भारत त्यांच्याकडे लक्ष देत नाहीये. काही तज्ञ सांगतात की, ट्रम्प जे टॅरिफबाबत नवीन घोषणा करत आहेत, त्यामागे हेच कारण आहे. ऑपरेशन सिंदूरपूर्वी अमेरिका जितका चांगला मित्र होता तितका तो आता नाही हे ट्रम्प यांचे वर्तन पाहून भारतालाही समजलं आहे.
हे तेच ट्रम्प आहेत ज्यांनी या वर्षाच्या सुरुवातीला पंतप्रधान मोदींना बांगलादेशसाठी मोकळीक दिली होती. त्यानंतर भारत आणि अमेरिका यांच्यातील मैत्रीची उदाहरणे दिली जाऊ लागली. पण ट्रम्प यांच्या मनःस्थितीत बदल झाल्यानंतर भारत चीनला अधिक प्राधान्य देत आहे.
वरिष्ठ नेते सतत भेट देत आहेत. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जूनमध्ये चीनला भेट दिली. त्यानंतर जुलैमध्ये परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी तेथे भेट दिली. आता पंतप्रधान मोदी स्वतः चीनला भेट देणार आहेत. ते 31 ऑगस्ट-1 सप्टेंबर रोजी शेजारील देशाला भेट देतील. ते SCO समिटमध्ये सहभागी होती. पंतप्रधानांचा हा दौरा चीनच्या निमंत्रणावरून होणार आहे.
या परिषदेव्यतिरिक्त, पंतप्रधान मोदी हे चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी द्विपक्षीय चर्चा देखील करू शकतात. यापूर्वी 23 ऑक्टोबर 2024 रोजी रशियातील कझान येथे दोन्ही नेत्यांची भेट झाली होती. पंतप्रधान मोदींचा चीन दौरा 7 वर्षांनी होणार आहे. यापूर्वी त्यांनी 2018 साली चीनला भेट दिली होती.
चीनशी मैत्री पण सावधपणे
2020 साली मध्ये गलवान येथे झालेल्या संघर्षानंतर, दोन्ही देश त्यांचे संबंध सुधारण्यात गुंतले आहेत. तेव्हापासून दोन्ही देशांनी संबंध सुधारण्याचा प्रयत्न केला आहे. मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू करण्यात आली. चिनी पर्यटकांसाठी व्हिसा जारी करण्यात आला आहे आणि थेट उड्डाणे पुन्हा सुरू करण्याचा विचार केला जात आहे. भारत हे सर्व करत आहे पण त्याचबरोबर वेळोवेळी ड्रॅगनला कडक संदेश दिला जातो. ऑपरेशन सिंदूरमध्ये चीनची भूमिकाही त्यांनी उघड केली होती.
यावरून असे दिसून येते की भारत आणि चीनमधील संबंध कितीही चांगले झाले तरी जिनपिंग कधीही मित्रांच्या यादीत वरच्या स्थानावर येणार नाहीत. कारण चीन वेळोवेळी भारताशी विश्वासघात करत आला आहे. तो कधीही विश्वासार्ह भागीदार नव्हता.