दैनिक चालू वार्ता
नागपूर प्रतिनिधी सतीश कडू
कृषि उत्पन्न बाजार समिती लाखनी येथील ६० मे. टन क्षमतेचा वाहन काट्या जप्त करून शासन जमा करण्याची मागणी- डॉ. दिपराज इलमकार
लाखनी: कृषि उत्पन्न बाजार समिती लाखनी येथील तत्कालीन संचालक मंडळ यांनी सन २०२० मध्ये ६० मे. टन क्षमतेचा नवीन वाहन काटा बाजार समितीच्या मुख्य यार्डात बसविला. चेतन वैरागडे यांच्याकडे वजन व मापे विकण्याचा वैध मापन शास्त्र विभागाचा कोणताही परवाना नसल्यामुळे त्याला वाहन काटा विकता येत नसल्याची तत्कालीन संचालक मंडळाला माहिती असतांनाही त्याची निविदा रद्द न करता वर्क आर्डर देऊन त्याच्याकडून रु. ७,४४,५८०/- मध्ये विकत घेतल्याचे बनावट व खोटे बिल (वाहन काटा विकता येत नसल्यामुळे बील देता येत नाही) तयार करून घेऊन ते समितीच्या रेकार्डवर उपलब्ध आहे.
नियमाप्रमाणे कोणताही वाहन काटा सुरु करण्यापूर्वी त्याला निरीक्षक वैध मापन शास्त्र कार्यालयाकडून त्याची पडताळणी व मुन्द्रांकन करून घ्यावा लागतो. त्याकरिता सदर कार्यालयाकडे वाहन काट्याचे पक्के खरेदी बिल व ज्या कंपनीच्या नावाने वाहन काट्याचा बिल असेल त्याच कंपनीचा मांडेल अप्प्रोवल व इतर कागदपत्रे असणे अनिवार्य व बंधनकारक आहे.
तत्कालीन बाजार समितीच्या संचालक मंडळांनी ६० मे. टन क्षमतेचा वाहन काट्याचे पडताळणी व मुद्रांकन करून घेण्याकरिता वैध मापन शास्त्र कार्यालय, साकोली येथे मे. वेटोट्रानिक्स वेईंग सिस्टीम रायपुर यांचा नावाचे जि एस टी नंबर असलेला बिल क्र. Invoice No. 606/136 दि. १४.०३.२०२० ला रु. ५,०८,५८०/- जिएसटी सह विकत घेतला. तसेच तत्कालीन संचालक मंडळांनी १ टन वजने हे मे. वेटोट्रानिक्स वेईंग सिस्टीम रायपुर यांच्याकडून जि एस टी नंबर असलेला बिल दि. १८.०३.२०२० ला रु. ७०,०००/- चा जिएसटी सह विकत घेतला असल्याचे बिल सादर करून दि. ०२.०६.२०२० ला पडताळणी व मुद्रांकन करून घेतले आहेत.
तत्कालीन संचालक मंडळाचे असे फुटले बिंग- सामाजिक कार्यकर्ता डॉ. दिपराज इलमकार यांनी बाजार समितीचे लेखापरीक्षणाचे निरीक्षण केले असता व जिल्हा उपनिबंधक कार्यालय, भंडारा येथून माहिती अधिकार अंतर्गत सदर बिल प्राप्त केले असता चेतन वैरागडे यांच्याकडून रु. ७,४४,५८०/- चे वाहन काटा विकत घेतल्याचे दिसून आले. तर वैध मापन शास्त्र कार्यालय, भंडारा येथील माहिती अधिकार अंतर्गत सदर वाहन काटा हा मे. वेटोट्रानिक्स वेईंग सिस्टीम रायपुर यांच्याकडून जि एस टी नंबर असलेला बिल क्र. Invoice No. 606/136 दि. १४.०३.२०२० ला रु. ५,०८,५८०/- घेतला असल्याचे लक्षात आले. १ टन वजने हे मे. वेटोट्रानिक्स वेईंग सिस्टीम रायपुर यांच्याकडून जि एस टी नंबर असलेला दि. १८.०३.२०२० चा रु. ७०,०००/- चा बिल सादर केला होता. तर चेतन वैरागडे यांच्याकडून १ टन वजने हे रु. ९२,५००/- . मध्ये विकत घेतले असल्याचे समितीच्या रेकार्ड वर बिल उपलब्ध आहे. यावरून एकच वाहन काटा आणि १ टन वजने यांचे २ वेगवेगळे बिल घेऊन दोन्ही बिलाची रक्कम हि वेगवेगळी आहे. यावरून बाजार समितीतील तत्कालीन संचालक मंडळ यांनी शासनाच्या पैशाची कशाप्रकारे अफरातफर केली आहे याचे हे जिवंत उदाहरण आहे.
तत्कालीन संचालक मंडळाची जिएसटी कराची चोरी माहिती अधिकारात उघड- तत्कालीन संचालक मंडळानी मे. वेटोट्रानिक्स वेईंग सिस्टीम, रायपुर यांच्याकडून ६० मे टन क्षमतेचा वाहन काटा रु. ५,०८,५८०/- व १ टन वजने रु. ७०,०००/- सन २०२० ला जिएसटी सह विकत घेतले असल्याचा बिल वैध मापन शास्त्र कार्यालय, साकोली येथ सादर करण्यात आला होता त्या बिलावर असलेला जिएसटी नंबर हा सन २०१९ मध्येच रद्द झाला असतांनाही तत्कालीन संचालक मंडळांनी जिएसटी चे खोटे बिल सन २०२० ला तयार करून शासनाची व लोकांची फसवणूक कली आहे. याबाबत राज्यकर सहआयुक्त, नागपूर येथे तक्रार दाखल केली असून पुढील चौकशी सुरु आहे.
याबाबत तत्कालीन संचालक मंडळांनी जिएसटी चे खोटे बिल सदर करून वैध मापन शास्त्र कार्यालयाची फसवणूक केली असल्याची डॉ. दिपराज इलमकार यांनी वैध मापन शास्त्र कार्यालय, भंडारा येथे तक्रार दाखल केली असून वैध मापन शास्त्र कार्यालय येथे समितीचे सचिव संजय पारोदे यांनी मे. वेटोट्रानिक्स वेईंग सिस्टीम रायपुर यांच्याकडून ६० मे टन क्षमतेचा वाहन काटा व १ टन वजने विकत घेतले नसल्याचे बयान दिले आहे. तर वेटोट्रानिक्स वेईंग सिस्टीम रायपुर यांनी बाजार समितीला ६० मे टन क्षमतेचा वाहन काटा व १ टन वजने विकत दिले नसल्याचे बयान दिले आहे. जिएसटी क्रमांक रद्द झालेला बनावट बिल सादर करून वैध मापन कार्यालयाची व शासनाची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले असल्याने सदर वाहन काटा जप्त करून शासन जमा करण्याबाबत सामाजिक कार्यकर्ता डॉ. दिपराज इलमकार यांनी सहनियंत्रक, वैध मापन शास्त्र, विभागीय कार्यालय, नागपूर यांच्याकडे तक्रार दिली असल्याने पां. मा. बिरादार, सहनियंत्रक यांनी दि. ०५.०८.२०२५ ला जि. वा. मोरे, प्र. उपनियंत्रक, चंद्रपूर-गडचिरोली जिल्हे यांच्या अध्यक्षतेखाली ३ सदस्यीय चौकशी समिती नेमली असून त्यामध्ये श्रीमती अंजली कोहारू निरीक्षक, साकोली विभाग, सु. वा. वाडे, निरीक्षक, वरोरा विभाग, पी. डी. मेश्राम निरीक्षक यांची समिती नेमली असून त्याना ७ दिवसाच्या आत अहवाल सादर करण्याकरीता कळविण्यात आले आहे.
डॉ.दीपराज इलामकार
8329227551