
दैनिक चालु वार्ता म्हसळा (रायगड )प्रतिनिधी -अंगद कांबळे
म्हसळा – रायगड जिल्हा परिषद शाळा लेप आदिवासी वाडी ता.म्हसळा येथे
जागतिक आदिवासी गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
शाळेतील शिक्षक विद्यार्थी, पालक, लेप गौळवाडी, लेप आदिवासीं वाडी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने या उत्साहात सहभागी झाले.
यावेळी लेप आदिवासीवाडी पासून ते लेप गौळवाडी पर्यंत आदिवासी परंपरा, संस्कृती ,नृत्य यांचे दर्शन करत विद्यार्थी व ग्रामस्थांनी रॅलीतून प्रदर्शन केले.
श्री. संजय वसावे, श्री. महेंद्र गायकवाड, श्री. ईश्वर तडवी, श्री लक्षमण वाघ यांनी आपल्या मनोगतातून आदिवासी समाजाचे हक्क आणि कर्तव्ये यांची जाणीव करून दिली. तसेच रायगड जिल्ह्यातील आदिवासी समाजाचे केवळ शिक्षणाच्या माध्यामातून आपली सामाजिक प्रगती साध्य होईल,सामाजिक प्रगती फक्त आणि फक्त शिक्षणामूळे शक्य आहे.म्हणुन मुलांना उच्च शिक्षण मिळेपर्यंत पालकांनी शिकवा असे आवाहन केले. उपसरपंच श्री. लाड साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी सरपंच सौ. शिगवण मॅडम, माजी सैनिक श्री. सावंत, पोलिस पाटील व ग्रामस्थ, म्हसळा तालुक्यातील आदिवासी शिक्षक वर्ग व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे उत्तम आयोजक नियोजक,शाळेचे मुख्याध्यापक श्री. गुरुदेव पावरा सर यांनी सूत्रसंचालन व आभार मानले. ग्रामस्थांनी कार्यक्रमाचा खूप खूप आनंद लुटला..