
सीक्रेट आलं समोर !
भारतात क्रिकेटबद्दल माहिती नाही असं एकही ठिकाण सापडणार नाही. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांनाच क्रिकेटबद्दल प्रेम आहे. बरीच लहान मुले क्रिकेट खेळत असतात आणि एक दिवस भारतासाठी खेळण्याचे त्यांचे स्वप्न असते.
मात्र भारतात अससेली स्पर्धा पाहता खूप कमी खेळाडू देशाकडून खेळताना दिसतात. यातील असे अनेक खेळाडू आहेत ज्यांनी फक्त 10 वी किंवा 12 वी पर्यंत शिक्षण घेतलेलं आहे. मात्र ते टीम इंडियामध्ये सामील होताच अस्खलित इंग्रजी बोलू लागतात. आज आपण कमी शिकलेले क्रिकेटपटू चांगले इंग्रजी कसे बोलू लागतात याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
समोर आलेल्या माहितीनुसार भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजे BCCI ने खेळाडूंचे व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी वेळोवेळी इंग्रजी भाषेचे वर्ग आयोजित करण्याचा निर्णय घेतलेला आहे. यात खेळाडूंनी इंग्रजी शिकवले जाते. पंचांसाठीही असे वर्ग आयोजित करण्यात आलेले आहेत. कारण BCCI आपल्या खेळाडूंच्या व्यक्तिमत्त्व विकासाकडे बारीक लक्ष देते. 2015 मध्ये बीसीसीआयने पंचांना इंग्रजी प्रशिक्षण देण्यासाठी एक कोर्स देखील सुरू केला असल्याची माहिती समोर आलेली आहे.
एमएस धोनीही इंग्रजी बोलताना अडखळायचा
समोर आलेल्या माहितीनुसार एमएस धोनीलाही इंग्रजी बोलण्यात अडचण येत होती. मात्र कालांतराने तो इतरांना बोलताना पाहून इंग्रजी बोलायला शिकला. जेव्हा सहकारी खेळाडू इंग्रजी बोलत असायचे तेव्हा धोनी त्यांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकत असे आणि त्यानंतर त्याची इंग्रजी सुधारली. स्टार खेळाडू वीरेंद्र सेहवाग आणि हरभजन सिंग हे सुरुवातीला इंग्रजीत मुलाखती देणे टाळत असायचे. मात्र आता जुने आणि नवे असे दोन्ही क्रिकेटपटू स्पष्ट इंग्रजी बोलतात.
सहकारी खेळाडू इंग्रजी बोलत असतात तेव्हा इतरही खेळाडू ती भाषा शिकतात. मोहम्मद शमीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, तो एका मुलाखतीला जाताना विराट कोहलीला ट्रान्सलेटर म्हणून घेऊन गेला होता. तसेच वेगवान गोलंदाज प्रवीण कुमारदेखील राहुल द्रविडला इंग्रजी भाषांतरासाठी सोबत घेऊन जात असे. मात्र कालांतराने या दोन्ही खेळाडूंसह इतरही अनेक खेळाडूंनी इंग्रजीचे ज्ञान घेतल्याचे समोर आले आहे.