
दैनिक चालू वार्ता
तालुका प्रतिनिधी : देवानंद शंकर आत्राम
मारेगाव पोलिस स्टेशनचे ठाणेदार पोलिस निरीक्षक उमेश बेसरकर वय (५५) यांचे सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे मारेगाव तालुक्यासह संपूर्ण पोलिस दलात आणि जनतेत हळहळ व्यक्त केली जात आहे. बेसरकर यांचे काही महिन्यांपूर्वी येथे बदली झाली होती. अल्पावधीतच त्यांनी आपल्या शांत , कर्तव्यनिष्ठ मनमिळावू स्वभावामुळे नागरिकांच्या मनात स्थान मिळवले होते. पोळ्यात तर स्वतः बंदोबस्तात सहभागी होते. प्रकृती ठीक नसल्यामुळे सुट्टीवर असताना त्यांचा मृत्यू झाला.