दैनिक चालु वार्ता मारेगाव तालुका प्रतिनिधी : देवानंद शंकर आत्राम
मारेगाव तालुक्यातील बुरांडा हेटी येथे आज दुपारी १. ३० वाजता राज्य महामार्गावर झालेल्या भिषण अपघातात मुकेश ज्ञानेश्वर आडे (वय २७, बुरांडा हेटी) यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून,गावात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुकेश आडे हे करंजी येथून आपले काम आटपून दुचाकीवरून गावाकड जात होता. गावाजवळील राज्य महामार्गावर ऐका भरधाव अज्ञात ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात मुकेशच्या डोक्याला जबर मार लागला. घटनास्थळी उपस्थित लोकांनी मुकेशाला मारेगाव येथील रुग्णालयात दाखल केले. अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला.
या दुर्घटनेमुळे आडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, मुकेश यांच्या पश्चात आई – वडील , दोन भाऊ, पत्नी, आणि केवळ चार महिनाचा मुलगा असा अप्त परिवार आहे.अचानक घडलेल्या या घटनेने गावकरी आणि नातेवाईकावर शोककळा पसरली आहे. अपघातस्थळी मोठी गर्दी जमली असून , स्थानकानी ट्रक चालकाविरुद्ध संताप व्यक्त केला आहे.
मारेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून, ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास मारेगाव पोलिस करीत आहेत.