दैनिक चालु वार्ता रिसोड/प्रतिनिधी:- भागवत घुगे
रिसोड:-ब्रह्माकुमारीज सेवा केंद्र रिसोड च्या वतीने 24 ऑगस्ट रविवारी ब्रह्माकुमारी संस्थेच्या माजी प्रशासिका दादीप्रकाशमणी यांच्या 18 व्या स्मृतिदिनानिमित्त रक्तदान शिबिराचे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात स्थानिक सिव्हिल लाईन स्थित ब्रह्मा कुमारीज सेवा केंद्रात करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरामध्ये एकूण 102 रक्तदात्यांनी रक्तदान करून दादी प्रकाशमणी यांच्या प्रती श्रद्धांजली अर्पित केली. रिसोड ब्रह्माकुमारी सेवा केंद्र संचालिका राजयोगिनी ब्रम्हाकुमारी ज्योती दीदी यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षस्थानी ब्रह्माकुमारी ज्योती दिदी तर उद्घाटक म्हणून रिसोड दिवाणी फौजदारी न्यायालयाचे न्यायाधीश सपकाळ साहेब,प्रमुख अतिथी पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण, तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर,आर्ट ऑफ लिविंगचे श्याम भैया तिवारी, समाजसेवक शहा फैजल, जिल्हा रुग्णालय वाशीम रक्त संचलन केंद्र प्रमुख डॉ.प्रणिता दिंडीकर इत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होते. सर्वप्रथम
सर्व मान्यवरांचे संस्थेच्या वतीने ज्योती दीदी वंदना दीदी यांनी पुष्पगुच्छ शाल व स्नेह भेट देऊन स्वागत केले.त्यानंतर मान्यवरांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी न्यायाधीश सपकाळ यांनी मनोगत व्यक्त करताना ब्रह्माकुमारी संस्थेने हाती घेतलेला रक्तदान शिबिराचा उपक्रम हा अत्यंत समाजोपयोगी असून या रक्तदानामुळे अनेक गरजूंना रक्त मिळवून अनेकांच्या परिवारातील लोकांना वाचवण्याचे पुण्य कार्य होणार आहे रक्तदान श्रेष्ठ दान असून इतर कोणतीही बाब कृत्रिमरीत्या तयार करता येते परंतु रक्त हे प्रयोगशाळेत तयार होत नसल्यामुळे ही रक्तदाना ची केलेली निष्काम सेवा पुण्य आणि समाधान मिळवून देणारी आहे या संस्थेने या उपक्रमाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने दादी प्रकाशमणी यांना श्रद्धांजली अर्पित केली असे मी मानतो असे न्यायाधीश म्हणाले.पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण यांनी या अध्यात्मिक संस्थेचा गुण गौरव करताना बदलत चाललेल्या सामाजिक स्थितीत समाज रचनेचे चिंतन करून अध्यात्मिक मार्ग स्वीकारणे हा जीवन जगण्याचा केंद्रबिंदू निश्चित करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी ब्रह्माकुमारीज मध्ये सातत्याने होत असलेल्या उपक्रमाबद्दल दीदींचे व परिवाराचे मनापासून कौतुक केले. तर समाजसेवी व्यक्तिमत्व शहा फैजल यांनी त्यांच्या शैलीमध्ये मनोगत व्यक्त करताना सर्व उपस्थित यांचे मने जिंकले ज्योती दीदी आणि ब्रह्माकुमारीज परिवार सतत शांतता, सामाजिक एकात्मता, राष्ट्रप्रेम सद्भावना याविषयी विविध उपक्रम राबवून समाजातील प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना ईश्वरीय ज्ञान देण्याचं कार्य करीत असल्यामुळे दीदींच्या व संस्थेच्या कार्याला कोणत्याही प्रकारची तोड नाही आध्यात्मिक ज्ञान हे ईश्वराने जतन केलेली संपत्ती असून त्याचा उपयोग समस्त मानव जातीच्या कल्याणासाठी व्हावा यासाठी ब्रह्माकुमारीज कटिबद्ध असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.आर्ट ऑफ लिविंग परिवाराच्या वतीने इंगोलेस यांनी मनोगत व्यक्त केले आणि संस्थेच्या उपक्रमामध्ये सहभाग घेता आला याबद्दल आयोजकांना विशेष धन्यवाद दिले.जिल्हा रुग्णालय व ब्रह्माकुमारीज च्या वतीने रक्तदात्यांना त्यांच्या श्रेष्ठ कार्याच्या सन्मानार्थ प्रमाणपत्राचे वितरण ज्योती दीदी व मान्यवरांच्या शुभहस्ते लगेच करण्यात आले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ज्योती दीदींनी न्यायाधीश, तहसीलदार व पोलिस निरीक्षक,तसेच इतरही मान्यवर उपस्थित राहिले आणि रक्तदाते व आयोजक यांना प्रोत्साहन दिले त्याबद्दल सर्वाना धन्यवाद दिले. दादी प्रकाशमणी संस्थेच्या अडोतीस वर्ष मुख्य प्रशासिका राहिल्या त्याच काळात संस्थेच्या सेवेचा विस्तार भारतासह इतर 120 पेक्षा अधिक देशात झाला.दादीनी संपूर्ण विश्वात शांती प्रस्तापीत व्हावी यासाठी बहुमूल्य योगदान दिले विश्वात बंधुभाव निर्माण व्हावा यासाठी पुढाकार घेतला.त्यांच्या कार्याची दखल घेत संयुक्त राष्ट्र संघटनेने त्यांना 1987 साली शांतिदूत परिवाराने सन्मानित केले.तसेच राजस्थान सरकारने त्यांना डी लिट पदवीने सन्मानित केले. म्हणून ददिच्या निधनानंतर त्यांचा स्मुर्ती दिवस विश्व बंधुत्व दिवस म्हणून साजरा केला जातो. दिल्याने वाढते ही त्यांची शिकवण आजही समाजाला देण्याची वृत्ती शिकवते म्हणून त्यांच्या स्मुर्ती दिनानिमित्त संपूर्ण देशात एक लाख युनिट रक्त संकलन कारण्याचा संकल्प संस्थेनी घेतला त्यामध्ये रिसोड ब्रह्माकुमारीज परिवाराने 102 युनिट रक्तदान करून आपले योगदान दिले असल्याचे मनोगत ज्योती दीदींनी व्यक्त केले व रक्तदात्यासह ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य केले त्या सर्वाना मनःपूर्वक धन्यवाद दिले.
कार्यकर्माचे सूत्रसंचालन ब्रह्माकुमारीज मीडिया विंग सदस्य रवि अंभोरे यांनी केले. तर आभार राजकुमार गाडे यांनी मानले. रक्तदान शिबीर यशस्वी कारण्यासाठी जिल्हा रुग्णालय वाशीमच्या रक्तसंकलन पथक व ब्रह्माकुमारीज परिवार रिसोड भाऊ बहिणींनी बहुमूल्य सहकार्य केले.


