
दैनिक चालु वार्ता मंठा प्रतिनिधी /सुरेश ज्ञा. दवणे
जालना( मंठा)
तालुक्यातील आरडा खारी येथे शिवसेना (उबाठा) पक्षाची जिल्हाप्रमुख महेश नळगे व तालुकाप्रमुख प्रदीप बोराडे यांच्या प्रमुख उपस्थितीत नवीन शाखा (ता.२३) शनिवार रोजी स्थापन करण्यात आली.या प्रसंगी ज्ञानेश्वर सरकटे,संजय नागरे, देविदास खरात,दिगंबर बोराडे, प्रल्हाद कदम,महादेव कव्हेळे, गोरख चव्हाण,सचिन चव्हाळ, रवी काळे,निलेश बोराडे,विजय वाघमारे,पवन वाघमारे,महादेव गोडे,प्रवीण पंडित,आदिराज बोराडे यांचे प्रमुख उपस्थिती होती.या वेळी तालुकाप्रमुख प्रदीप बोराडे यांनी गाव तिथे शाखा स्थापन करणार असल्याचे सांगून (उबाठा) पक्षाला ग्रामीण भागातून पाठबळ मिळत असल्याने येणाऱ्या निवडणुकांमध्ये पक्षातील कार्यकर्त्यांनी सज्जा असावे असे सांगितले. या वेळी आरडा खारी येथील शाखाप्रमुख,ग्रा.प.सदस्य संदीप ढेगळे, उपशाखाप्रमुख भागवत ढेगळे,सचिव अक्षय ढेंगळे, सतीश बहिरट, सदस्य माणिक ढेंगळ, वैभव बहिरट, कृष्णा तळेकर, मोहन कळणे, रवी बहिरट,एकनाथ ढेंगळे,गोपीनाथ ढेंगळे ,गणेश ढेंगळे ,अमोल कळणे, महेश बहिरट, हर्षद आकात ,वैभव खराबे, अशोक ढेंगळे ,गोविंद ढेंगळे ,पाराजी ढेंगळे, बंडू ढेंगळे ,बाळू तळेकर ,अनिल भदर्गे यांची नियुक्ती करण्यात आली.