
दैनिक चालु वार्ता मंठा प्रतिनिधी/सुरेश ज्ञा. दवणे
जालणा (मंठा)
पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रवींद्र निकाळजे यांची बदली झाल्याने नूतन पोलीस निरीक्षक म्हणून मनोज कुमार राठोड यांनी मंगळवार ता.१० अगस्ट रोजी पदभार स्वीकारला आहे.
मंठा तालुक्यातील मटका, जुगार, अवैध गुटखा अवैध प्रवासी वाहतूक, अवैध दारू विक्री रोखण्यासह मेन रोड वरील रहदारी सुरळीत करण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर उभे ठाकले आहे. मंठा पोलीस स्टेशनचा अवैद्य कमाईचे माहेरघर म्हणून जिल्हाभरात नावलौकिक आहे, मंठा पोलीस स्टेशनचा पदभार मिळावा म्हणून गृहमंत्रालयापर्यंत फिल्डिंग लावली जाते, मंठा पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक पदाचा पदभार मिळविण्यासाठी अनेक नावे चर्चेत होती, मात्र जालना येथे कर्तव्य बजावलेल्या पोलीस निरीक्षक मनोज कुमार राठोड यांची वर्णी लागली. मंठा येथे जुगार खेळण्यासाठी परभणी, बुलढाणा जिल्ह्यातून जुगारी येतात याठिकाणी लाखोंची उलाढाल होते हे सर्वश्रुत आहे. नूतन पोलीस निरीक्षक मनोज कुमार राठोड हे अवैध धंदे रोखण्यात कितपत यशस्वी होतात हे येणारा काळच सांगणार आहे. मेन रोडवरील रहदारी सुरळीत करण्याचे पहिले काम त्यांना करावे लागणार असून सत्कार समारंभातुन त्यांनी लवकरच बाहेर पडावे अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिक व्यक्त करीत आहेत.