
या आमदाराने दिला जाहीर पाठिंबा; मोर्चात सहभागी !
मराठा आरक्षण मिळवण्यासाठी मनोज जरांगे पाटील आज मुंबईकडे रवाना झाले.
अंतरवाली सराटीमध्ये पत्रकारांशी संवाद साधल्यानंतर जरांगे पाटील यांनी मुंबईकडे कूच केली. त्यांनी राज्यातील सर्व मराठा आमदारांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले होते. मनोज जरांगे पाटील यांना आमदार संदीप क्षीरसागर यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. मनोज जरांगे पाटील निघाल्यानंतर त्यांच्या मोर्चामध्ये जाऊन संदीप क्षीरसागर यांनी त्यांचा सत्कार केला. त्याशिवाय आपण मुंबईपर्यंत तुमच्यासोबत येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अंतरावाली सराटीमधून मनोज जरांगे पाटील सकाळी १० वाजता मुंबईसाठी रवाना झाले. त्यावेळी लाखो मराठा त्यांच्यासोबत सहभागी होते. शेकडो गाड्या, दुचाकीसह जरांगेंच्या मोर्चात मराठा सामील झाले होते. संयमाने आंदोलन करण्याचा इशारा देत शेकडो शिलेदारांसह जरांगे पाटील आज मुंबईकडे निघाले. आरपारची लढाई आहे, आम्हाला पाठिंबा द्या, असे आवाहन त्यांनी केले होते. बीडमधील आमदार संदीप क्षीरसागर यांनी तात्काळ जरांगे यांची भेट घेत आपला पाठिंबा जाहीर केला. त्यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली, त्यांचा सत्कार केला.
मनोज जरांगे पाटीलएकनाथ शिंदे सच्चा माणूस आहे. गोरगरीबांची जाण असणारा माणूस आहे. सत्तेपेक्षा लोकांच्या प्रश्नांना महत्त्व देणारा माणूस म्हणजे एकनाथ शिंदे आहे.
संदीप क्षीरसागर हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे बीडमधील आमदार आहेत. त्यांनी पहिल्यापासूनच जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. आताही जरांगेंनी आरपारची लढाई असल्याचे सांगताच त्यांना आपला पाठिंबा जाहीर केला. आमदार संदीप क्षीरसागर हे मनोज जरांगे यांच्या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत. अंतरवाली सराटी ते मुंबईपर्यंत क्षीरसादर मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत.
संदीप क्षीरसागर, आमदार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटइथे कुणी आमदार नाही, सर्वसामान्य म्हणून मी जरांगे यांच्यासोबत सहभागी झालो आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत मुंबईपर्यंत सोबत असेल.