
भारतावर टॅरिफ बॉम्ब पण स्वत: रशियासोबत करत आहे ‘हा’ करार…
वॉशिंग्टन/मॉस्को : अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणात दुहेरी खेळ दिसून येत आहे. एकीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प रशियाकडून तेल खरेदीमुळे भारतावर भारी-भक्कम टॅरिफ लादत आहेत, मात्र दुसरीकडे स्वत: रशियासोबत उर्जा करारांवर चर्चा करत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नुकतेच दोन्ही देशांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तेल आणि गॅस प्रकल्पांशी संबंधित गुंतवणूकीवर चर्चा केली आहे.
यामुळे ट्रम्प यांच्या दुहेरी खेळीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ५०% टॅरिफ लागू केले आहे, जे आजापासून (२७ ऑगस्ट) १२.०१ मिनिटांनी लागू होणार आहे. मात्र भारताने ट्रम्प पुढे न झुकण्याचा निर्णय घेतला आहे.
अमेरिका रशियात काय चर्चा झाली?
१५ ऑगस्ट रोजी झालेल्या चर्चांमध्ये तेल-गॅस प्रक्लांपावर थोडक्यात चर्चा झाली. यावेळी अमेरिकेने रशियासमोर काही अटी ठेवल्या आहेत.
या चर्चत रशियाच्या सखालिन तेल-१ आणि गॅस प्रकल्पामध्ये अमेरिकेच्या एक्सॉन कंपनीला प्रवेश दिला जावा. हा प्रकल्प रशियाच्या सरकारी तेल कंपनीशी जोडलेला आहे.
तसेच रशियाच्या आर्क्टिक LNG-2 साठी अमेरिकेकडून उपकरणे रशियाने खरेदी करण्यावरही चर्चा झाली.
तिसरा आणखी एक करार म्हणजे अमेरिका रशियाकडून अणुउर्जेवर चालणारी आइसब्रेखर जहाजे खरेदी करण्याचाही प्रस्ताव बैठकीत मांडण्यात आला होता. ही जहाजे आर्क्टिक प्रदेशात तेल आणि वायू वाहतूकीसाठी अत्यंत महत्वाची मानली जातत.
या चर्चेदरम्यान ट्रम्प प्रशासनाचे अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
अमेरिकन दूत स्टीव्ह विटकॉफ यांनी देखील मॉस्कोत रशियातील गुंतवणूकदारांशीही चर्चा केली.
जर अमेरिका आणि रशियामध्ये हे करार यशस्वी झाले तर ट्रम्प यांना राजकीय दृष्ट्या मोठा फायदा होईल. याच वेळी ट्रम्प यांनी भारताला पुन्हा एकदा गंभीर इशारा दिला आहे. युक्रेनमध्ये शांतता प्रस्थापित न झाल्यास ते रशियावर आणखी निर्बंध लादतील तसेच भारतावरही कठोर शुल्क लादतील असे त्यांनी म्हटले आहे.
सध्या ट्रम्प यांची ही दुहेरी खेळी भारतासाठी मोठे संकट निर्माण करत आहे. भारत हा रशियन तेलाचा मोठा खरेदीदार आहे. पण ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे मोठा परिणाम होत आहे. सध्या रशियावरील निर्बंध हटवण्याचे दिशेने प्रयत्न करणे अत्यंत महत्वाचे आहे.