
थेट दाखवला आरसा; अमेरिकेलाच…
डोनाल्ड ट्रम्प यांचे वरिष्ठ सल्लागार पीटर नवारो हेभारताबद्दल सातत्याने आग ओकताना दिसत आहेत. त्यांनी आतापर्यंत भारतावर काही गंभीर आरोप केली. पीटर नवारो यांनी म्हटले, भारताच्या टॅरिफमुळे अमेरिकेतील नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत.
भारत हा फक्त नफेखोरीसाठी रशियाकडून तेल खरेदी करतोय. काहीही झाले तरीही भारताने रशियाकडून तेल खरेदी करणे बंद करावे आणि युक्रेनच्या लोकांचा जीव घेणे थांबावे. पीटर यांच्या भडकावू विधानांना भारत दुर्लक्ष करताना दिसला. मात्र, आता भारताकडून नवारो यांनी जोरदार उत्तर देण्यात आलंय.
भारताने आता पीटर नवारो यांना कोंडीत पकडत थेट वस्तूस्थिती एक्सवर सांगितलीये. भारताची तेल आयात ऊर्जा सुरक्षेशी संबंधित आहे आणि ती कोणत्याही आंतरराष्ट्रीय निर्बंधांचे उल्लंघन करत नाही, असे स्पष्ट उत्तर त्यांना दिली. पुढे म्हटले की, पीटर यांच्या दाव्याचा फॅक्ट चेक केला. कम्युनिटी नोटमध्ये लिहिले की रशियाकडून भारताची तेल आयात ही फक्त नफ्यासाठी नाही. उलटे हे ऊर्जा सुरक्षेसाठी आहे. मुळात म्हणजे यातून कोणत्याही आंतरराष्ट्रीय निर्बंधांचे उल्लंघन होत नाही.
पुढे लिहिण्यात आले की, भारत काही टॅरिफ (शुल्क) आकारत असला तरीही अमेरिकेचा भारतासोबत सेवांमध्ये व्यापार अधिशेष आहे. अमेरिका स्वतः रशियाकडून काही वस्तू आयात करते, यातून तुमचे दुटप्पी धोरण थेटपणे पुढे येते. हेच नाही तर भारताच्या या नोटनंतर नवारोने थेट कम्युनिटी नोटला कचरा म्हटले आहे. एलोन मस्कवर आता त्यांनी संताप व्यक्त केला. त्यांनी लोकांच्या पोस्टमध्ये प्रचार घुसवू दिल्याचा आरोप केला आहे.
काल डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काैतुक केले. नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना प्रतिसाद दिला. मात्र, आता भारत देखील अमेरिकेसारख्याच भूमिकेत असल्याचे बघायला मिळतंय. मागील काही दिवसांपासून पीटर नवारो हे भारताच्या विरोधात वादग्रस्त विधाने करताना दिसत आहेत, आता त्यांना जोरदार प्रतिउत्तर देण्यात आले आहे. पीटर नवारो यांचे आरोप भारताने पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. ते निराधार आणि दिशाभूल करणारे म्हटले. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेत थेट रशियाकडून भारताची तेल आयात पूर्णपणे ऊर्जा सुरक्षा आणि जागतिक सुरक्षेसाठी आहे, असे स्पष्ट म्हटले.