दैनिक चालु वार्ता माळशिरस प्रतिनिधी -प्रा विजय गेंड
अकलूज येथील शंकरराव मोहिते महाविद्यालयामध्ये वनस्पतीशास्त्र विभागा अंतर्गत रानभाजी पालेभाज्यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले.या कार्यक्रमाचे प्रदर्शन व उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवप्रसाद टिळेकर यांनी केले. या उद्घाटन प्रसंगी मनोगतातून,’रानभाज्या या मानवास अतिशय आरोग्यदायी असून त्या पावसाळ्यामध्ये मुबलक प्रमाणामध्ये मिळतात,आपल्या आहारामध्ये याचा उपयोग करणे अतिशय फायदेशीर असल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत वनस्पती शास्त्र विभाग प्रमुख डॉ. सौ. सविता सातपुते यांनी केले. त्यांनी याप्रसंगी आजच्या तरूण मुलांनी जंकफूडच्या नादी न लागता शरीरास आवश्यक असणाऱ्या रानभाज्यांचा आहारात उपयोग करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.रानभाज्या प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी शेवगाभाजी, माठभाजी ,पातरभाजी, गुळवेलभाजी, चिघळभाजी, शेवगापालाभाजी, हादगाफुलभाजी,अंबाडीभाजी, तांदूळसाभाजी, अळूपाने व आगाडाभाजी अशा विविध रानभाज्यांच्या पाककृतीसह प्रदर्शन करण्यात आले. प्रदर्शन प्रस़गी उपस्थित सर्वांनी या रानभाज्यांचा आस्वाद घेतला. या रानभाजी प्रदर्शनास महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद डॉ. जनार्धन परकाळे ,
डॉ. शिरीषकुमार शिंदे , डॉ. निवृत्ती लोखंडे प्रा.दादासाहेब कोकाटे,डॉ. अण्णासाहेब नलवडे,कार्यालयीन प्रबंधक श्री. राजेंद्र बामणे, कार्यालयीन अधिक्षक श्री युवराज मालूसरे यांनी भेट दिली आणि विद्यार्थ्यांचेही कौतुक केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.कुंभार व्ही. एम. यांनी केले तर उपस्थित सर्वाचे आभार श्री. साठे ए. ए. यांनी मानले.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वनस्पती शास्त्र विभागातील प्रा वाघ एस. एच., प्रा माने देशमुख बी. एफ., सावंत मॅडम व बी.एस्सी भाग तीन वर्गातील विद्यार्थी, विद्यार्थिनी,शिक्षकेतर कर्मचारी श्री.कदम बी. बी.यांनी परिश्रम घेतले.
सराटाभाजी, तांदूळसाभाजी, पालकभाजी अशा विविध प्रकारच्या रानभाज्या खाण्यापासून हल्लीची पिढी दूर जात आहे-
प्राचार्य शिवप्रसाद टिळेकर
