
रशियातून भारतात येणार जगाची झोप उडवणारी युद्धनौका !
भारताचे रशियासोबत चांगले संबंध आहेत. रशियासोबतच्या व्यापाराला विरोध करत अमेरिकेने भारतावर 50 टक्के टॅरिफ लावलेला असला तरी भारताने मात्र रशियासोबतचा व्यापार थांबलेला नाही. असे असतानाच आता रशियातून भारतात INS तमाल नावाच मोठी युद्धनौका येणार आहे.
भारताच्या या महाकाय युद्धनौकेचे नाव INS तमाल असे आहे. विशेष म्हणजे परदेशातून भारतीय नौसेनेत दाखल होणारी ही शेवटची युद्धनौका असणार आहे. यानंतर भारताच्या नौसेनेत कोणतीही परदेशी युद्धनौका सामील होणार नाही.
INS तमाल ही युद्धनौका भारतात आल्यानंतर पश्चिमी किनार्यावर तैनात केली जाणार आहे. रशियातून निघाल्यानंतर या युद्धनौकेने अनेक देशांसोबत युद्धाभ्यास केला. त्यानंतर आता INS तमाल ही युद्धनौका भारतात येणार आहे.
2016 साली भारत आणि रशियात एक करार झाला होता. या कराराअंतर्गत 4 तलवार क्लास स्टेल्थ फ्रिगेट करण्याचे ठरवण्यात आले होते. यातील दोन युद्धनौका या रशियात तर दोन युद्धनौका या भारतात तयारी होतील, असे ठरवण्यात आले होते.
या कराराप्रमाणे गेल्या वर्षीच रशियाने तयार केलेली तुशील ही युद्धनौका भारताच्या नौदलात सामील करण्यात आली. आता या वर्षी भारताला तमाल ही युद्धनौका मिळालेली असून ती लवकरच भारताच्या नौसेनेत सामील करून घेतली जाणार आहे.