
चाहत्यांचा उडाला भडका…
आशिया कप २०२५ स्पर्धेला मंगळवार, ९ सप्टेंबर रोजी सुरू झाली आहे.
या स्पर्धेतील पहिला सामना अफगाणिस्तान आणि हाँगकाँग यांच्यात खेळवण्यात आला आहे. या सामन्यात अफगाणिस्ताने हाँगकाँगचा ९४ धावांनी मोठा पराभव केला. त्याच वेळी, आज म्हणजे टीम इंडिया १० सप्टेंबर रोजी यूएईविरुद्ध आपला पहिला सामना खेळून आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. यादरम्यान भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवकडून मोठी चूक झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे त्याच्यावर भारतीय चाहते भडकले आहेत. सूर्याने नेमके काय केले याबाबत आपण जाणून घेऊया.
आशिया कप २०२५ च्या पहिल्या दिवशी म्हणजे ९ सप्टेंबर रोजी स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व संघांच्या कर्णधारांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या दरम्यान, टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवदेखील सहभागी झाला होता. परंतु या दरम्यान सूर्या असे काही करून बसला की ज्यानंतर सोशल मीडियावरील चाहते त्याच्यावर संतापले आणि त्याला ‘देशद्रोही’ असल्याचा थेट आरोपच लावला चाहते इटक्यावरच थांबले नाहीत तर सूर्याची लाज देखील काढली. भारताच्या कर्णधाराविरोधात सोशल मीडियावरील चाहत्यांकडून प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
सूर्याने नेमकं काय केलं?
अफगाणिस्तान आणि हाँगकाँग यांच्यातील सामन्यापूर्वी, दुबईमध्ये सर्व सहभागी संघांच्या कर्णधारांची पत्रकार परिषद पार पडली. या दरम्यान, कर्णधारांना अनेक देखील प्रश्न विचारण्यात आले. त्याचवेळी, पत्रकार परिषदे संपल्यानंतर सूर्यकुमार यादव पीसीबी अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्याशी हस्तांदोलन करताना दिसून आला. या हस्तांदोलनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला आणि सूर्याला रोषाला सामोरे जावे लागले. पाहलगाम दहशतवादी हल्ला झाला तेव्हा त्यात २६ भारतीय नागरिक मरण पावले होते. यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पाकिस्तानविरोधात देशात आधीच संतापाची लाट आहे. आशा वेळी सूर्या पीसीबी अध्यक्षांसोबत हस्तांदोलन करत आहे. ही बाब भारतीय चाहत्यांना रुचली नाही आणि त्यांनी संताप व्यक्त केला.
१४ सप्टेंबर रोजी रंगणार भारत-पाकिस्तान सामना
आशिया कपमध्ये टीम यूएईनंतर, भारतीय संघाचा दुसरा सामना १४ सप्टेंबर रोजी पाकिस्तानविरुद्ध असणार आहे. संपूर्ण क्रिकेट जगाचे लक्ष्य या सामन्याकडे लागून आहे. या सामन्यापूर्वी दोन्ही देशांच्या चाहत्यांमध्ये प्रचंड संताप असल्याचे दिसून येत आहे.