
थेट आदेश; म्हणाले 100 टक्के…
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची दुटप्पी भूमिका पुन्हा एकदा जगासमोर येताना दिसत आहे. एकीकडे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काैतुक करत माझे जवळचे मित्र आहेत आणि राहणार असे म्हणताना दिसतायत.
दुसरकडे डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारताच्या विरोधात आग ओकल्याचे बघायला मिळतंय. डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच भारतावर 100 टक्के टॅरिफ लावा असे थेट आवाहनच युरोपला केलंय. अमेरिकेने भारतावर 50 टक्के टॅरिफ लावलाय. मात्र, हा टॅरिफ लावून अजून डोनाल्ड ट्रम्प यांचे पोट भरले नसून आता त्यांनी थेट 100 टक्के टॅरिफ लावण्याचे आवाहन युरोपला केले. अमेरिकेने भारतावर लावलेल्या टॅरिफचा मोठा फटका भारताला अगोदरच बसलाय. भारतातून अमेरिकेत होणारी तब्बल 70 टक्के निर्यात बंद झालीये.
युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्ध भडकले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, भारत हा रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने रशियाला या युद्धासाठी मोठा पैसा मिळत आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यातील शांतीचा मार्ग हा दिल्लीहून जातो. जर भारताने रशियाकडून तेल खरेदी करणे बंद केले तर त्यांच्याकडे या युद्धासाठी पैसाच राहणार नाही. फक्त भारतच नाही तर यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांच्या निशाण्यावर चीन देखील आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी युरोपला आवाहन करत म्हटले की, भारत आणि चीन या दोन्ही देशांवर 100 टक्के टॅरिफ लावा. मात्र, अमेरिकेने भारतावर जरी 50 टक्के टॅरिफ लावला असला तरीही त्यांनी चीनवर अजूनही कोणता टॅरिफ आकारला नाही. रशियाकडून भारतापेक्षाही अधिक तेल खरेदी करणारा देश चीन आहे. मात्र, पहिल्यांदाच डोनाल्ड ट्रम्प हे चीनच्या विरोधात भूमिका घेण्यास युरोपला सांगत आहेत. भारत तर त्यांच्या निशाण्यावर अगोदरपासूनच आहे.
भारताबद्दल फक्त डोनाल्ड ट्रम्प हेच नाही तर त्यांचे सहकारी देखील वादग्रस्त विधाने करत आहेत. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यास इच्छुक आहे, असे सांगणारेच डोनाल्ड ट्रम्प आता भारतावर 100 टक्के टॅरिफ लावण्याचे आवाहन करताना दिसत आहेत. मात्र, यावर अजून भारताने काही भाष्य केले नाहीये. मात्र, मागील काही दिवसांपासून भारत हा देखील अमेरिकेला सडेतोड उत्तर देताना दिसत आहे.